अरे राजा ही “कार्टी काळजात घुसली.”
चल गड्या बघूया फसली तर फसली
“ओळखं ना पाळख” नाही ना रे तिच्याशी
कावली तर विचारु तुच ना “मोरूची मावशी”
लाजुनी म्हणालीचं “चल तुझं काही तरीच “
सांगेल तिला अजुन “ब्रम्हचारी “आहे मीच
नाहीं मी “बहुरूपी “मी तर तुझाच “पाहुणा “
प्रेमवीर तुझा,सांग ना, तू माझी होशील ना
“जादु तेरी नजर “बघं घायाळ झाला जिगर
राणी तुच सांग कसा राहू मी तुझ्या बिगर
“सुंदर मी होणार “हेचं सांगत होतीस खरे
तुझ्यातले सौंदर्यच “नकळत दिसलं सारे “
भेटतील तुला ही “व्यक्ती तितक्या वल्ली “
स्वर्गातच आपल्या “लग्नाची गाठ” बांधली
मस्तीत घालवु दोघं “चार दिवस प्रेमाचे”
तुच माझी “प्रियतमा “क्षण हेचं आनंदाचे
अडकविन ग पायात तुझ्या “लग्नाची बेडी”
करूनी “बे दुणे पाचं “वाढवू या “प्रीती संगम”
“गेला माधव कुणीकडे “म्हणतं गावं केलं तिन गोळा
“संशय कल्लोळ “चा किडा डोक्यात तिच्या बळावला
संसाराला आग लावणारी “सासू माझी धासू”
अन्याय अत्याचार दोघींचे किती हो मी सोसू
इथेच थांबली आमच्या “एका लग्नाची गोष्ट”
जवळचे तुम्ही म्हणुनचं सांगतोय मी स्पष्ट
सासूला समजावून सांगितलं “आम्ही दोघं राजा राणी.”
संसारात आमच्या ढवळा ढवळ नका करु कुणी
होईलचं संसारात आमच्या कधी कुर बुर
पण अविरत चालू राहिलं आमची “टुर टूर “
भरल्या घरात आमची “लेकुरे उदंड झाली”
निंदा करायची एकही संधी नाही सोडली
“श्री तशी सौ” अल्लड अवखळ भारी जोडी
खळखळ वाहणाऱ्या पाण्याची त्यांना गोडी
खळखळ वाहणाऱ्या पाण्याची त्यांना गोडी
“एका लग्नाची पुढची गोष्ट” दणक्यात सुरु
धडा शिकविण्याच्या नादात नका हो विसरु
“सारखं काही तरी होतंय” मला तरी उमजेना
कसं सांगु “माझिया भाऊजींना रीत कळेना”
“शु….. कुठं बोलायचं नाही” कुठं सांगायचं नाहीं
” साखर खाल्लेला माणूस” शोधून मिळायचा नाही
विनय पिंपरकर
9527968484
नावा सह शेअर करायला माझी काही हरकत नाही…..
Leave a Reply