मिळवलेस तूं जे जे काही,
कौतूक त्याचे सारे करतील
स्तुती सुमनातील भाव जमूनी,
हृदयामधले दालन भरतील….१
उचंबळूनी जाशील जेव्हां,
बांध फुटेल नयनामधुनी
ओघळणारे अश्रू सांगतील,
भाग्य तुझे ग आले उजळूनी….२
दरवळू दे सुंगध सारा,
नभांत जातील यश तरंग
स्वर्गांमधुनी ‘भावू ‘बघतील
भीजव त्यांचे सारे अंग…३
(चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल)
— डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply