नवीन लेखन...

सरोदवादक आशिष खान देबशर्मा

आशिष खान देबशर्मा हे अली अकबर खान यांचे चिरंजीव, अलाउद्दीन खान हे त्यांचे आजोबा. सरोदवादक आशिष खान देबशर्मा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३९ यांचा जन्म खाला. त्यांची मावशी, म्हणजे अन्नपूर्णादेवी. आशिष खान देबशर्मा यानी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या आजोबांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेण्यास सुरवात केली, व पुढे अली अकबर खान यांच्या कडे तालीम घेतली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ नॅशनल प्रोग्राम मध्ये आणि व तानसेन म्युझिक संमेलन मध्ये आपल्या वडिलांसोबत आणि आजोबांबरोबर वादन सादर केले होते.

२००२ मध्ये त्यांना अमेरिकेतील इलिनॉय आर्ट्स कौन्सिलची फेलोशिप आणि २००५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ साली रोजी आशिष खान ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलोशिप मिळाली. आशिष खान देबशर्मा यांना २००६ सालासाठी त्याला “गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद” अल्बमसाठी ‘बेस्ट वर्ल्ड म्युझिक’ श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.

आशिष खान यांनी जॉन बारम, जॉर्ज हॅरिसन, रिंगो स्टार, द बीटल्स, एरिक क्लॅप्टन, चार्ल्स लॉयड, जॉन हाडी, अॅलिस कोलट्रणे, एमिल रिचर्ड्स, डॅलस स्मिथ, डॉन पोप, जॉर्ज स्ट्रुनझ, अरदिशर फराह अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. आशिष खान सध्या न्यू ऑरलियन्स संगीतकारांसोबत टिम ग्रीन आणि जेसन मार्सलिस यांच्यासारखे आशिष खान सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस, लॉस एन्जेलिस, यूएस येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे सहायक प्रोफेसर आणि अमेरिकेतील सांताक्रुझ येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संगीत विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट


गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद
https://www.youtube.com/watch?v=_bpsXIJUxPI

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..