खरेच विचार करण्यासारखे आहे , म्हणून मी माझा मित्र बापू राऊत याला फोन केला , उलट त्यानेच मला प्रश्न विचारला अश्लील म्हणजे काय. मी भरपूर शब्द सागितले तो नाही म्हणत गेला , शेवटी मीच म्हणालो तू सांग…त्याने एका शब्दात उत्तर दिले…. कपडे.
खरे तर त्याच्या या शब्दाने मला हादरवले आणि विचार करण्यास भाग पाडले मी या उत्तराने अस्वस्थ झालो आणि मला जवळ जवळ तीस पस्तीस वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला गोव्याचा. गोव्यात मी मित्र त्याची वृध्द आई फिरत होतो.
इतक्यात त्या बीच वर एक सुंदर मुलगी तिच्या मैत्रिणी बरोबर हसत खेळत होती. मित्राच्या आईने साडी नेसली होती. तिला त्याचे कौतुक वाटले. ती हसली मी तिला इंग्रजीत विचारले कुठून आलात तशी ती म्हणाली जर्मनी. त्यावेळी मी जर्मन भाषा शिकत होतो. मी पण मोडक्या तोडक्या जर्मन भाषेत बोललो. आम्ही ग्रुप फोटो काढला.
जरा पुढे आलो. मी सहज मागे बघितले तर त्या मुलीने आणि तिच्या मैत्रिणीने सगळे क पडे उतरवले होते आणि वाळूत आडव्या झाल्या, सूर्यप्रकाश खात. आम्ही परत फिरलो तेव्हा मित्राची आई म्हणाली ती मुलगी कुठे. मी त्या वाळूवर पडलेल्या मुलीकडे बघुन म्हणालो हीच ती मुलगी. मित्राची आई अक्षरशः किंचाळलीच तिला बघून. मला काहीच वाटले नाही उलट लक्षात आले ती मुलगी त्या कपड्यात आकर्षक दिसत होती . अशा अवस्थेत पाहून मला फारसे काहीच वाटले नाही कारण आधी त्या बीच वर आधी येऊन गेलो होतो. हा जुना प्रसंग आठवला. एक जाणवले नग्नता अश्लील नसते ती अत्यंत साधी असते. मी हे लिहित आहे, वाचताना तुम्ही पण विचार करणार. आज कपडे आपण गरज म्हणून घालतो का सुंदर दिसावे म्हणून. ? असे असेल तर फॅशनच्या नावाने लक्तरे लोबाणारे , अंग दाखवणारे कपडे का घालतो ?
सतत दरोरोज मीडिया साठी वेगवेगळे कपडे लोक का घालतात ? किती प्रश्न निर्माण करतात हे कपडे ?
कपडे आणि माणूस ? कपडे अंगात घालण्यासाठी असतात, अंग झाकण्यासाठी देखील आणि अंग दाखवण्यासाठी
देखील ? मी अजून कपडे श्लील का अश्लील या प्रश्नाभोवती फिरत आहे ?आणखी एक विचार असा आहे की कपड्याच्या दुकानाबाहेर जे पुतळे असतात त्यावर कपडे कसे दिसतात, आकर्षक दिसतात. मला आठवतय किंवा तुमच्याही लक्षात येत असेल त्या कपड्याच्या पुतळ्यांना जेव्हा कपडे नेसवतात ते दुकानाच्या आत मध्ये नेसवतात ?
माझ्या तर मेदुचा भुगा झालाय.
तुमचे काय…पडलाय कधी असा प्रश्न ?
खरेच कपडे महत्वाचे का आतील माणूस.
सतीश चाफेकर
Leave a Reply