हा आंब्याच्या सारखा दिसणारा ८-१० मीटर उंच सदा हिरवा राहणारा वृक्ष आहे.ह्याची पाने ८-१६ सेंमी लांब व आंब्याच्या पाना सारखी दिसतात.फुले दाट व गुच्छात येतात.हि सुगंधी व आकर्षक पिवळट तांबड्य् रंगाची असतात.फळ ८-२५ सेंमी लांब व ४ सेंमी रूंद असते शेंगा चपट्या असतात व त्यात ४-८ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा,बीज व फुले आहेत.हा चवीला तुरट,कडू असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कफ पित्तनाशक आहे.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)वेदना प्रधान विकारात अशोक सालीचा लेप करतात.
२)तुरट असल्याने रक्तस्तंभक व कडू रूक्ष गुणाने रक्त शुद्धी करते म्हणून रक्त दुष्टी जन्य विकारात अशोक उपयुक्त आहे.
३)तुरट चव व शीत वीर्य ह्या मुळे अशोक क्लेद नाशक अाहे त्यामुळे गर्भाशय शैथिल्य नष्ट करून वेदना व स्त्राव अशोक कमी करतो.तसेच गर्भाशयाच्या कार्याला चालना देतो.त्यातील रक्तवाहिन्या व स्नायूंचा संकोच करून त्यांची क्रिया सुधारते व रक्तस्त्राव थांबवितो.Endometrium व Ovary वर उत्तेजक कार्य करते.
४)अंगावर लाल अथवा पांढरा स्त्राव जात असल्यास अशोक साल चुर्ण तांदुळाच्या धुवणातून देतात.
५)गर्भिणी स्त्रीला सगर्भावस्थेत अशोक घृत सेवन करायला दिल्यास गर्भपाताचा धोका टळतो.
६)अशोक तुरट चवीचा व थंड गुणाचा असल्याने स्तंभक व दुष्ट कफनाशक म्हणून चांगले काम करतो त्यामुळे अतिसार,प्रवाहिका व कृमी मध्ये ह्याचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply