अमिन आणि अशोक लहानपणापासून एकाच वर्गात होते.
वर्गातसुध्दा एकाच बाकावर बसायचे. मधल्यासुटीत दोघे मिळून एकत्र डबा खायचे. एकच डबा खायचे! दोघे एकमेकांचे खास दोस्त!
दोघांना एकमेकाशिवाय अजिबात करमत नसे. जिथे अशोक तिथे अमिन असे!
अशोकचे आई वडील कोकणात असत. अशोक त्याच्या काकांकडे राही. घरात अशोक आणि काका, दोघंच. काका सकाळी गिरणीत कामाला जात. संध्याकाळी अशोक काकांना स्वयंपाक करायला मदत करी. काकांना रात्रपाळी असली की, अशोक अमिनकडे झोपायला जाई.
अशोकचा मधल्यावेळचा डबा अमिनच आणत असे. अशोकचा अभ्यास, त्याचं आजारपण,त्याला काय हवं? काय नको? हे सुध्दा अम्मीच पाहात असे.
अम्मी नेहमी म्हणत असे, “मुझे ये दो प्यारे बच्चे है अशोक और अमिन! अशोक मेरा सबसे लाडला है!!”
उन्हाळ्याच्या सुटीत अमिन, अशोक बरोबर कोकणात जाई.
त्यावेळी, अशोकची आई, अमिनची ‘मां’होत असे, अमिनची अम्मी होत असे! ती कौतुकाने अमिनची प्रत्येक गोष्ट ऐकायची. त्याचे भारी लाड करायची.
महिनाभर अशोक आणि अमिन मजा करत.
सकाळी नदीत डुंबणं, दिवसभर भटकणं, खेळणं,गोष्टींची पुस्तकं वाचणं, आंबे-फणस मटकावणं, झाडावर चढून जांभळे खाणं असा कार्यक्रम.
अशोकच्या घरी अमिनची चंगळ असे.
सुटी संपूच नये असं त्यांना वाटे.
अमिन आणि अशोक खिडकीतून पाहून-पाहून कंटाळले.
अंधारात पाहायचं म्हणजे,डोळे ताणून पाहावं लागतं. खूप सावध असावं लागतं. अगदी बारीक सारीक आवाज सुध्दा कानाने टिपावे लागतात.
पण कुठेच काही घडेना.
अमिन वैतागून म्हणाला, “अशोक कुठे रे काय?तुला उगाच संशय.
तस्सं काही नसणारंच रे.”
“नही यार.माझा अंदाज चुकणार नाही.” अमिनच्या खांद्यावर हात ठेवत,अशोक हलकेच पुढे बोलू लागला; “अरे कालपण माझ्या काकांना रात्रपाळी होती. काल काकांनी कामावर जाताना पाहिलं की,’चार-पाच माणसं खांद्यावर पोती घेऊन कचरा कुंडीत टाकत होती.’ एव्हढ्या रात्री अचानक इतका कचरा कुठून आला? म्हणजे, नक्कीच तो कचरा नसणार…!…”
अमिन पुढे सरकत भीत-भीत म्हणाला, “हाय अल्ला! मग काय असेल त्यात? काही भयानक तर नसेल ना?
आणि हे तुला सगळं कधी समजलं?
कुणी सांगितलं?
तो फिर मैं क्या करू?”
“आधी माझं ऐक सारं. आज सकाळी मला काकांनी सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर मला संशय आला. मी सकाळी उगाचच कचरा कुंडी जवळ फेरी मारली. तर तिथे फक्त कचराच! पण………..” अशोक बोलता-बोलता गप्प झाला.
अमिन अशोक कडे रोखून पाहात म्हणाला, “पण?….पण… काय अशोक? कुछ दगा फटका तर नाही ना?”
ठअजून तरी नक्की सांगता येत नाही.
पण,सकाळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. “आज शेवटच्या तीन संडासांना कुलुपं लावली होती. आणि त्याच्या बाहेर दोन अनोळखी माणसं पाहारा करत बसली होती.”
मी कचरा कुंडी जवळ उगाचच घुटमळतो आहे हे लक्षात आल्यावर, त्यातल्या एकाने मला दटावलं. उगाचच आवाज चढवून झापलं. त्यामुळे अमिन, माझी खात्रीच झालीय की, आज रात्री काही तरी होणार!!
काहीतरी भयानक घटना घडणार!
आपण अतिशय सावध राहायला हवं.ठ
अशोकं बोलणं ऐकून,अमिन कापऱ्या आवाजात म्हणाला, “आज….आज.. अब्बाजान असते तर बरं झालं असतं रे! पण ते तर चार दिवसापूर्वीच लखनौला गेलेत. तिकडे दादाजी खूप आजारी आहेत ना.
आता…आात आपण काय करायचं रे अशोक? मला थोडीशी भीती वाटतेय.. आणि मला काही सूचत पण नाहिए रे.”
अमिनला समजावत अशोक म्हणाला, “घाबरू नकोस. आत्ता मी जे तुला सांगिन, ते तू अम्मीला सांगू नकोस. मला भिती वाटते, एखादवेळेस अम्मी घाबरेल.
आणि एक लक्षात ठेव, “तू एकटा नाहीस, आपण दोघे आहोत! आपण दोघे मिळून कुठलही कठीण काम सहजी करू शकतो!”
तोच, कचरा कुंडी जवळ त्यांना काही हालचाल दिसू लागली.
काळे कपडे घातलेली ती सात-आठ माणसं होती. काहींनी तोंडावर रुमाल बांधले होते.
दोघांनी कुंडीतला कचरा खणायला सुरुवात केली.
थोड्याच वेळात त्यांनी कुंडीतून चार पोती आणि दोन पेट्या बाहेर काढल्या. त्याचवेळी अंधारातून लपत छपत आणखी चार माणसं आली. त्यांच्या खांद्यावर जड पोती होती.
एकाने झटकन पुढे होऊन,शेवटून तिसऱ्या संडासाचे कुलुप उघडले.
ती जड पोती संडासात ठेवली. पुन्हा दाराला कुलुप लावले.
मग एकाने सावकाश पेटी उघडली.
दुसऱ्याने बॅटरी पेटवली.
चार दिशांना चार माणसे पाळत ठेवून होती.
बाकीचे सारे पेटीच्या सभोवार उभे राहिले.
बॅटरीच्या प्रकाशात काहीतरी खुडबूड-कूडबूड सुरू झाले. बाटलीवर बाटली आपटल्याचे आवाज अधून मधून ऐकू येऊ लागले. फनेल घेऊन बाटलीत काहीतरी भरलं जातंय, इतकंच कळत होतं.
इतक्यात,बाटली फुटल्याचा खळकन आवाज आला!
आणि त्यापाठोपाठ फाडकन कानफटात मारल्याचा आवाज घुमला!!
क्षणभर काम थांबलं.
लागोपाठच्या ह्या दोन खतरनाक आवाजांनी,खिडकीतून लपून पाहणाऱ्या ‘त्या दोघांच्या’ अंगावर भितीने सरसरून काटा आला.
ते दोघे खिडकीपासून क्षणभर लांब झाले. त्यांनी दचकून अम्मीकडे पाहिलं.
पण अम्मी एकाग्रपणे जपमाळ घेऊन जप करत होती.
Leave a Reply