नवीन लेखन...

हास्यकवी अशोक नायगावकर

मोठाल्या मिशांचे कवी नायगावकर हे घरोघरी हास्याची कारंजी फुलवत असतात.त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९४७ रोजी वाई येथे झाला. अशोक नायगावकर यांचे लहानपण गरीबीमुळे कष्टात गेले. त्यांची आई जी कामे करत असत त्याला ते मदत करत. आईबरोबर पापड करणे, मसाले कुटणे अशी सर्व कामे अर्थार्जनासाठी केली. याचवेळी प्र. के. अत्रे, लोहिया, दादासाहेब जगताप अशा अनेक लोकांची भाषणे त्यांनी ऐकली. नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. ते उत्तम सतार वादकही आहेत. तसेच त्यांचा अध्यात्माकडे ओढ आहे. योगी पुरुष बाबुराव कुळकर्णी हे त्यांचे अध्यात्मिक गुरू आहेत असे मानले जाते.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते २०१० पासून सदस्य होते. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मा.अशोक नायगावकर भूषविले होते. या संमेलनात ते म्हणाले होते,’महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.’ उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृध्द व्हाल, असे ते म्हणतात. कतार, सिंगापूर, बँकॉक, दुबई, इस्त्रायल, लंडन, न्यूकॅसल, शिकागो, डेट्राईट, लॉसएंजेलिस, बफेलो, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून आल्या होत्या. अशोक नायगावकर ह्यांनी प्रेमकविता, ग्रामीण कविता, पर्यावरण जाणीवेच्या कविता, सामाजिक, राजकीय कविता अशा अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on हास्यकवी अशोक नायगावकर

  1. DEAR SHRI SANJIV VELANKAR SAHEB,

    I AM COLONEL B C JOGLEKAR. I STAY IN ARMY HSG SOC, SALUNKE VIHAR,WANWADI-KONDHWA AREA IN PUNE.
    OUR SOCIETY IS AR MY PERSONNEL OF ALL RANKS AND ALSO DEFENCE WIDOWS.WE HOLD SEVERAL PROGRAMMES OF CULTURAL AND ENTERTAINMENT IN OUR SOCIETY.
    WE WISH TO INVITE SHRI ASHOK NAIGAONKAR ON ONE OF THE OCCASIONS. MAY THEREFORE REQUEST YOU TO OBLIGE SEND ME CONTACT DETAILS LIKE EMAIL AND CELLPHONE NUMBER OF SHRI NAIGAONKAR.

    WITH WARM REGARDS AND BEST WISHES,

    YOURS SINCERELY

    COLONEL B CJ OGLEKAR

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..