नवीन लेखन...

अशोक राणे; सिनेमा पाहणारा माणूस..!!

आपल्यापैकी प्रत्येकजण उपजिविकेसाठी काही ना काही उद्योग-धंदा करतो.. आपल्यालाही कशाची न कशाची तरी आवड असते..मात्र आपला व्यवसाय व आपली आवड यांचा ताळमेळ कधीच बसत नाही..आवड आणि व्यवसाय यांची सांगड बसली ना, की मग ते काम ‘बोजा’ न बनता आनंदाचा स्त्रोत बनतं..समाधीची अनुभुती देणारं ठरतं..खुप कमी माणसं अशी भाग्यवान असतात..अशाच काही सुदैवी लोकांपैकी एक आहेत माझे ज्येष्ठ स्नेही श्री. अशोक राणे..!

सिनेमाची भूल पडली नाही असा भारतीय माणूस विरळा. आज वयाच्या पन्नाशीच्या आगे-मागे असणाऱ्यांना सिनेमा हे एक अप्रूप असायचं..अॅडव्हान्स बुकींगमध्ये तिकिट मिळालं, की खजीना मिळाल्याचा आमंद व्हायचा आणि मग मन त्या दिवसाची आतूरतेने वाट पाहायचं..असं सर्व असलं तरी सिनेमा ही आपल्यासाठी फक्त मनोरंजन करणारी अलिबाबाची गुहा होती..

श्री. अशोक राणे..यांनाही सिनेमाने अशीच भुल घातली. सिनेमाची ही भुल पुढे वेडात बदलली..हे वेड त्यांनी जाणीवपूर्वक जोपसलं..ते पुढे एवढं फोफावल की ‘सिनेमा पाहणे’ हा त्यांचा चक्क पूर्णवेळचा व्यवसायच झाला..आणि अशोकजींची ओळख ‘सिनेमा पाहणारा माणूस’ अशी घट्ट झाली..!!

अशोक राणे..आपल्या देशीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेपत्रकारीता क्षेत्रातलं एक बडं नांव..सिनेमा पाहता पाहता ते सिने पत्रकार व पुढे समिक्षक झाले..अनेकानेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धांमध्ये अशोकजींना ज्युरी म्हणून सन्मानानं बोलावलं जातं..त्यांचं मत आवर्जून विराचात घेतलं जातं..

आपण अनेक चित्रपट पाहतो..पिक्चर चांगला किंवा वाईट येवढा प्लेन शेरा आपण मारतो व विसरून जातो..अशोकजींच्या दृष्टीने कोणताही चित्रपट पूर्णपणे वाईट कधीच नसतो. प्रेक्षकांनी पूर्णपणे पाठ फिरवलेल्या एखाद्या चित्रपटातही ‘पाहण्यारखं’, ‘अनुभवण्यासारखं’ काहीतरी असतंच आणि ते ‘पाहवं कसं’, हे अशोकजी शिकवतात..त्यांनी दिलेली ‘दृष्टी’ घेऊन कोणतंही पिक्चर पाहीलं की मग तो चित्रपट चांगला किंवा वाईट न ठरता ‘आनंदानुभव’ देणारा ठरतो..

अशोकजींकडे देशी-परदेशी चित्रसृष्टीतील अनुभवांचा, किश्श्यांचा प्रचंड साठा आहे..त्यांना भेटलेली चित्रपटातली माणसं, त्यांचे चित्र-विचित्र-विक्षीप्त स्वभाव, एखाद्या सिनेमातलं गाणं किंवा एखादा उत्कट प्रसंग चित्रीत करताना त्यामागील दिग्दर्शकाचा दृष्टीकोन, सिक्वेन्स अशा अनेक गोष्टी श्री. अशोक राणे लवकरच आपल्याशी शेअर करणार आहेत..

..आणि हा कार्यक्रम आपल्यापर्यंत घेऊन येत आहे माझा दुसरा अवलीया बालमित्र नरेश खराडे..नरेशने यापूर्वी अनेक सुंदर कार्यक्रम प्रेक्षकांना दिले आहेत व त्यातील मुकुटमणी म्हणजे सिद्धहस्त कवी जगदीश खेबुडकरांसोबत सादर केलेला ‘चित्रगंगा’ हा कार्यक्रम..

श्री. अशोक राणे आणि नरेश खराडे यांना एकत्र आणण्याचं – लग्न लावणाऱ्या भटजी सारखं- केवळ ‘पुरोहीता’चं- काम मी केलंय..

नरेश खराडे आता श्री. अशोक राणेंना घेऊन एक हटके कार्यक्रम लवकरच आपल्यापर्यंत घेऊन येत आहे – “अशोक राणे; सिनेमा पाहणारा माणूस..!!”

हा कार्यक्रम पाहून आपल्याला सिनेमा पाहण्याची एक नवी ‘नजर’ लाभेल यात शंका नाही..!!

-गणेश साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..