नवीन लेखन...

मराठवाड्यातील अष्टविनायक

अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते. अशी जरी श्री अष्टविनायक यात्रा आपल्याला अध्याहृत असते, तशाच प्रकारची काही गणेशस्थाने महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण, अशा भागांमध्ये गणेशभक्तांना तेवढ्या तोलामोलाची वाटतात आणि अशा अष्टविनायकांचीही यात्रा बऱ्याच गणेशभक्तांमध्ये प्रचलित आहे. ही सर्व गणेशस्थानेसुद्धा प्राचीन असून येथेही विविध देवतांनी, ऋषींनी गणेशाची उपासना केल्याचे आढळते. मराठवाड्यातील अष्टविनायकांच्या स्थानांना मोठी पौराणिक पूर्वपीठिका असून ती सर्व गणेशभक्तांची आवडती श्रद्धास्थाने आहेत. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे-

लक्षविनायक –
तारकासुराचा वध करण्यासाठी शंकर-पार्वतींचा पुत्र स्कंद (कार्तिकेय) याने सर्व देवांचा सेनापती म्हणून येथे गणेशाची उपासना केली. हे स्थान वेरुळ औरंगाबाद येथे आहे.

अमलाश्रमक्षेत्र –
बीड जिल्ह्यातील नामलगाव येथील हे स्थान अतिशय प्रसिद्ध क्षेत्र मानले जाते. या ठिकाणी भृशुंडी ऋषींनी फार मोठी गणेशाची उपासना केली. आपल्या उत्कट भक्तीच्या जारावर श्रीभृशुंडी ऋषींना गणेशासारखी सोंड प्राप्त झाली व त्यांना प्रतिगणेश संबोधले जाऊ लागले.

प्रवाळ धरणीधर गणेश –
याच तीर्थक्षेत्री कार्तवीर्य राजाने येथे गणेशाची तपश्चर्या करून प्रवाळ गणेश या गणेशमूर्तीची स्थापना केली. तसेच अखिल नागांचा सम्राट सहस्त्रफणाधारी महाशेष याने पृथ्वी धारण करण्याचे सामर्थ्य व सर्व प्रकारचे योगवैभव मिळविण्याकरीता याच ठिकाणी गणेशाचे आराधन केले आणि धरणीधर गणेश नावाने दुसरी गणेशमूर्ती स्थापन केली. हे क्षेत्र पद्मालय क्षेत्र म्हणून प्रसिध्द असून एरंडोल (जळगाव) जवळ आहे.
प्रत्येक हातात शस्त्रे, कमळ, धान्याची लोंबी, डाळिंब वगैरे धारण केलेल्या आहेत. गणेशाच्या डाव्या मांडीवर छोटीशी सिद्धलक्ष्मीची मूर्ती आहे. शंभू महादेव हेदवकर व शिवराम (काकासाहेब) जोगळेकर या दोन्ही गणेशभक्तांनी तन-मन-धनाने या गणेशमंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

कड्यावरचा सिध्दिविनायक –
(आंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी)
सिद्धीविनायकाचे हे स्थान प्राचीन असून समुद्राच्या पाण्यामुळे पूर्वीच्या देवळाची हानी होत होती. ती टाळण्यासाठी या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना टेकडीवर केली गेली. श्री. रामकृष्ण भट या अग्निहोत्री ब्राह्मणाला स्वप्नदृष्टांतामध्ये वरील गणेशमंदिराचा जीर्णोद्धार करावा अशा आज्ञेमुळे त्यांनी पेशव्यांच्या कारकिर्दीतील अधिकारी दादाजीपंत घाणेकर यांच्या मदतीने या गणेशाचा जीर्णोद्धार केला. मंदिराची बांधणी वाकटकालीन असून गणेशमूर्ती उजव्या सोंडेचीच ऋद्धिसिध्दीसह आहे.

श्रीआशापूरक सिद्धिविनायक –
(केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) –
केळशी गावातील परांजपे आळीतील हे सिद्धिविनायक मंदिर अत्यंत निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. दोन मूषकांनी आधार दिलेल्या कमलासनावर आरूढ झालेली जवळजवळ तीन फूट उंचीची, शुभ्रधवल संगमरवराची उजव्या सोंडेची अत्यंत देखणी मूर्ती आहे. उत्सवकाळात नारळ, गूळ व तांदळाच्या जाडसर रव्यापासून केलेले सिध्दलाडू हा याचा विशेष नैवेद्य असतो.

उफराटा गणपती-
(गुहागर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) –
गुहागरवासीयांचे आराध्य दैवत व खरे कुटुंबीयांचे कुलदैवत म्हणून हा गणपती प्रसिध्द आहे. साधारण सव्वातीनशे वर्षांपूर्वी मच्छिमारांना ही मूर्ती समुद्रात सापडली होती. गुहागर गावाला समुद्राच्या भयंकर अशा लाटांच्या प्रवाहातून स्वतः समुद्राकडे म्हणजे उफराटे तोंड करून बसून काही वर्षांपूर्वी गणेशभक्तांच्या आराधनेने या गणपतीने गावाचे रक्षण केले. अशी आख्यायिका आहे. गणपतीची मूर्ती अतिशय देखणी असून जागृत स्थान म्हणून त्याची ख्याती आहे.

द्विभुज महागणपती –
(रेडी, ता. शिरोडा, जि. वेंगुर्ला)
रेडी येथील मँगनीज खाणीत काम करणारे श्री. सदानंद यांना झालेल्या दृष्टांताप्रमाणे समुद्राजवळील दाट झाडीमध्ये खोदकाम केल्यानंतर ही गणेशमूर्ती सापडली आहे. ही महागणपतीची मूर्ती विशाल असून दीड फूट उंचीच्या बैठकीवर साडेसहा फूटांहून अधिक उंच व साडेतीन फूटांहून अधिक रुंद अशा ध्यानाची आहे. गणपतीचा उंदीरही तीन फूट लांब व २ फूट रुंद अशा प्रचंड पाषाणातील आहे. मूर्ती द्विभूज असून पितांबर नेसलेली आहे. नवसाला पावणारा हा गणपती पांडवकालीनही आहे असे म्हणतात.

वीरविघ्नेश/ जोशी यांचा अठरा हातांचा गणपती –
(पतितपावन मंदिराजवळ, रत्नागिरी) –
महालक्ष्मी व गणपती असे हे एकत्रित रूप आहे. महालक्ष्मीचे सोळा हात एकत्र असल्यामुळे हा अठरा हातांचा गणपती दिसतो. ही लक्ष्मीस्वरुप गणपतीची मूर्ती संगमरवरी असून अतिशय स्पष्ट आहे. हे गणेशमंदिर विद्वान व गणेशभक्त श्री. विनायकराव जोशी यांनी अंदाजे १९६० च्या सुमारास बांधले.

-प्रदीप रामचंद्र रास्ते

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..