नवीन लेखन...

एशियन पेंटस्

नवीन वर्षाची जशी आपल्याला उत्सुकता अधिक दिवाळीमध्ये फटाके- रंगीबेरंगी कपडे असते त्यापेक्षा उत्साह असतो. फराळ- आणि हा आकाशकंदिलासह आपण आपल्याघरातील सर्व खोल्या इ. सर्व रंगाने सजवतो. वास्तविक, राजे-महाराजेच त्यांच्या प्रासादाला रंग देण्याचे संदर्भ ग्रीक आणि चंद्रगुप्त मौर्य काळापासूनचे आढळतात. मात्र पुढे पुढे हा संकेत बदलत गेला. आता तर प्रत्येकजणच त्याच्या स्वतःच्या मनाचा अन् कुटुंबाचा, ‘राजा’ असतो. प्रत्येकजणेच त्याच्या घराला रंग देऊन सजवतोच… हीच कल्पना पुढे अधिक व्यापक करून o & M या जाहिरात संस्थेने ‘स्लोगन’ केली…. ‘Every Home A story to Tell.’ ‘हर घर कुछ कहता है।’ आपण जसे आपल्या घरात  राहत असतो तसेच घरही आपल्यात राहत असते ही भावना या स्लोगनमागे असावी. ‘भावना’ व्यक्त करण्याचं अत्यंत प्रभावी आणि सर्वत्र उपयोगात आणलं जाणारं माध्यम म्हणजे रंग! २ फेब्रुवारी १९४२ रोजी हिंदुस्थानात एक ‘रंगसंवाद’ सुरू झाला. ‘एशियन पेंटस्’ त्याचं नाव. चंपकलाल चोक्सी, चिमणलाल चोक्सी, सूर्यकांत दानी आणि रविंद वकील यांनी ‘द एशियन ऑइल अॅण्ड पेंटस् कं.’ या नावाने व्यवसाय सुरू केला. हे नाव निश्चित करण्याला अगदी सामान्य असे उदाहरण घडले!’टेलिफोन डिरेक्टरी’ची पाने चाळत असताना हे नाव उचलले गेले. ‘एशियन’ या शब्दामुळे साऱ्या आशिया खंडाशी काहीतरी संबंध असावा, असा ग्रह-समज वाचताक्षणीच पंडावा… असं हे नाव अल्पावधीतच ग्राहकप्रिय झाले. सध्या अश्विन चोक्सी आणि अश्विन दाणी यांच्यासह अभय वकील हे जबाबदारी सांभाळत असलेल्या ‘एशियन पेंटस’मध्ये २०१५ च्या संदर्भानुसार ५८७० अधिकारी आणि कर्मचारी नोकरी करतात. ७० वर्षांच्या या कंपनीने जगाच्या सहा भागांमध्ये व्यवसायवृद्धी केली. साऊथ एशिया, साऊथ ईस्ट एशिया, साऊथ पॅसिफिक, मिडल ईस्ट देश, कॅरिबियन प्रदेश अशा विविध प्रदेशांमध्ये कंपनीने रंगपुरवठा केला आहे.

भौगोलिक प्रदेशांच्या नैसर्गिक वातावरणाचा अभ्यास करून कंपनीने रंगोत्पादन केलेले आहे. ‘एशियन पेंटस’ हे उत्पादन हिंदुस्थान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका अशा देशांमध्ये पुरविले जाते. ‘SCIB पेंटस’ हे इजिप्तमध्ये निर्यात केले जातात. तर ‘BERGER’ पेंटस् सिंगापूर, यू.ए.ई., ओमान, जमैका, बार्बाडोस, त्रिनिदाद, तबोगा अशा साऊथ ईस्ट आणि मिडल ईस्ट देशांमध्ये निर्यात केले जातात. ‘APCO COATING’ पेंटस’ हे साऊथ पॅसिफिककडील फिजी, टोंगा, सोलोमन, झाईसलँड, व्हॅनुटू अशा (कधी कधी काही देशांची नोंदही ऐकलेली नसतील) देशात एशियन पेंटसची उत्पादने पोहोचली ही सर्व उत्पादने पोहोचविणारा एक ‘मुलगा’ ‘ज्याच्या डोक्यावरील केस उभारलेले आहेत, उजव्या डोळ्याने, तो झाकून (डोळा मारून) त्या उत्पादनाची मजा काही औरच आहे हे सांगणारा ‘गट्टू’ हा तुमच्या आमच्या साऱ्यांच्याच घरात असतो तसा पविभूषण व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी चितारला आणि ‘कॉमन मॅन’प्रमाणेच प्रत्येक रंगीत घरात पोहोचविला. हा ‘गट्ट’ अर्थात ‘मॅस्कॉट’ साऱ्या जगात एशियन पेंटसच्या रंगांना पोहचवीत आहे १९५४ सालापासून. आर. के. नी त्याला १९५४ ला जन्माला घातले.

जगातील २०० लघु कंपन्यांमध्ये ‘एशियन पेंटस्’ला २००२-०३ मध्ये ‘फोर्बस्’ मासिकाने ‘Best Under a Billion’ ॲवॉर्ड दिले, इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस टुडे, फोर्बस  नियतकालिकांनी कंपनीची आशियातील सर्वात बेस्ट कंपनी म्हणून नोंद घेतली.

-प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..