इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.
Leave a Reply