मी जर अस्मिता वेशीवरी टांगली असती
स्वर्गसुखदा ! मी सारीच भोगली असती..
अहोरात्र कष्टप्रदी क्षण सारेच मी वेचिले
संगत संस्कारांची मजला सावरत होती..
जरी तडजोडही या जीवनी घुसमटलेली
राखिली बहुतांची अंतरंगे मित्रांच्या संगती..
म्हणूनिया आज जगतो तृप्त मी हा असा
गुंफुनिया भावनांना मुक्त काव्या सांगाती..
एकएक भावशब्द निरंतर दान दयाघनाचे
वेचुनी अलगदी माळीतो प्रीत भक्तीसंगती..
सोहळे ऋतुचक्रांचे सारेच शब्दात माझ्या
बरसती अनाहत , अव्याहत कृपाळू संगती..
या कृतार्थ जीवनी , रांजण भरलेले सुखाचे..
सदा सर्वकाळ आज ओतप्रोत ओसंडीती..
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.७२ / ३१ – ५ – २०२१
Leave a Reply