अस्तित्व तुझे सभोवार
सर्वत्र तुझाच स्पर्शभास
वात्सल्य तुझे लडिवाळ
माते तुझाच अंतरी ध्यास…..
तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
पान्हा, तुझा अमृती घास
तव आशीष कवचकुंडले
आठवे तुझे रूप निरागस…..
सत्य! तुच जननी सृष्टिची
निरपेक्ष तुझाच गे सहवास
आज अंतरी अस्तिव तुझे
मज सावरिते क्षणाक्षणास….
साक्षात, तुच गे देवदेवता
तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
लाभते जन्मी भाग्यवंतास….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४१
१९/९/२०२२
Leave a Reply