ज्योतिषविषयक माहिती व उपाय सांगणार्या या सदरात पत्रिकेतील विविध ग्रहांच्या वेगवेगळ्या स्थानांविषयी माहिती दिली जाईल. या भागात पत्रिकेत मंगळ असलेल्या व्यक्तींसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. हे साधे सोपे उपाय अवलंबून पहा….
सप्तम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रीकेत सप्तम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – पोवळे धारण करणे.
२ – खोटे बोलु नका.
३ – नोकरांना खुश ठेवा.
४ – गणपतीची उपासना करा.
अष्टम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रीकेत अष्टम स्थानात मंगळ आहे त्यांनी करावयाचे उपाय.
१ – गणपतीची उपासना करणे.
२ – मसुरडाळ मंदिरात दान करणे.
३ – विधवा स्त्री ला मदत करणे.व तिचा आशिर्वाद घेणे.
४ – चांदीची अंगठी बोटात घालणे.
नवम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत नवंम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ – लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवणे.
२ – मंगळवारी मारुतीला शेंदुर लावणे.
३ – काळभैरवाची उपासना करणे.
४ – विधवा स्त्रिला मदत करणे.
दशम स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत दशम स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ – सोने विकु नये
२ – अपंग व्यक्तीला मदत करावी.
३ – घरात दुध उतु जाऊन देवु नये.
४ – निपुत्रीकाची सेवा करा
अकराव्या स्थानातील मंगळ – ज्यांच्या पत्रिकेत अकराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय
१ – पांढरा कुत्रा घरात पाळा.
२ – गणपतिची उपासना करा.
३ – वडिलोपार्जीत इस्टेट विकु नये.
४ – रुग्णांना मदत करा.
बाराव्या स्थानातील मंगळ. – ज्यांच्या पत्रिकेत बाराव्या स्थानात मंगळ आहे त्यांनी करायचे उपाय.
१ – सकाळी उठल्यावर मध खाणे.
२ – पक्षांना धान्य घालणे
३ – १५ दिवस सलग सव्वाई गुळ पाण्यात प्रवाहित करणे.
सौ. निलीमा प्रधान