अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग बद्दल सर्वांना माहिती आहे, की त्यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. २१ जुलै १९६९ रोजी त्यांनी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले आणि २.५ तास अंतराळ प्रवास केला . २० जुलै १९६९ रोजी चंद्रावर उतरलेल्या अपोलो ११ यानात आर्मस्ट्राँग होते. त्याच्यासोबत आणखी एक अंतराळवीर एडविन ऑल्ड्रिन होता.
नीलच्या वडिलांचे नाव स्टीफन आर्मस्ट्राँग आणि आईचे नाव व्हायोला लुई एंजल होते. नीलला आणखी दोन भाऊ होते, त्यांची नावे जून आणि डीन होती, नील सर्वात लहान होता.
नील आर्मस्ट्राँगचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी वापाकोनेटा, ओहायो येथे झाला.जेव्हा नील फक्त ५ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला पहिल्यांदा उड्डाण करण्याचा अनुभव दिला. ते लहान वयात असताना त्यांनी अनेक खगोल विज्ञानाशी निगडित पुस्तके वाचली . नील आर्मस्ट्रॉंग हे मोठे विज्ञानाचे वेडे होते.
खगोलशास्त्रज्ञ होण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि कोरिया युद्धातही भाग घेतला होता.नील एक एरोस्पेस अभियंता, चाचणी पायलट, नौदल अधिकारी तसेच प्राध्यापक होते. नंतर नौदलात, पुरुड विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते ड्रायड्रेन फ्लाइट रिसर्च सेंटरमध्ये रुजू झाले. ते एवढ्यावरच थांबला नाही, या केंद्रात सामील झाल्यानंतर त्याने ९०० हून अधिक उड्डाणे केली.
२० जुलै १९६९ रोजी, आर्मस्ट्राँग आणि अपोलो ११ लुनार मॉड्यूल (एलएम) पायलट बझ आल्ड्रिन हे चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती बनले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी चंद्र मॉड्यूल ईगल अंतराळयानाच्या बाहेर अडीच तास घालवले . अपोलो ११ कमांड मॉड्यूल कोलंबियामध्ये. चंद्राच्या कक्षेत. जेव्हा आर्मस्ट्राँगने चंद्राच्या पृष्ठभागावर प्रथम पाऊल ठेवले तेव्हा ते प्रसिद्धपणे म्हणाले: “हे माणसासाठी एक लहानशे पाऊल आहे, पण हे मानवजातीसाठी एक मोठी झेप आहे.” जगभरातील अंदाजे ५३० दशलक्ष दर्शकांसाठी त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी १९६१ मध्ये “मनुष्याला चंद्रावर उतरवणे आणि त्याला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत करणे” हे राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करून, दशकाच्या समाप्तीपूर्वी अपोलो ११ ने अंतराळ शर्यतीत अमेरिकन विजय प्रभावीपणे सिद्ध केले. कॉलिन्स आणि आल्ड्रिन यांच्यासोबत, आर्मस्ट्राँग यांना राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी स्वातंत्र्य पदक प्रदान केले आणि १९६९ ची कॉलियर ट्रॉफी ही नील आर्मस्ट्रॉंग ना प्रदान केली. अध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यांना १९७८ मध्ये कॉंग्रेसनल स्पेस मेडल ऑफ ऑनर प्रदान केले, १९७९ मध्ये नॅशनल एव्हिएशन हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले गेले .
१९७१ मध्ये नासाचा राजीनामा दिल्यानंतर आर्मस्ट्राँग यांनी १९७९ पर्यंत सिनसिनाटी विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात अध्यापन केले. नील २०० पेक्षा जास्त प्रकारची विमाने उडवली . नील आर्मस्ट्राँगने अनेक प्रकारची विमाने उडवली. यातील एक विमान ताशी ४००० किमी वेगाने उड्डाण करणारे होते.
नीलने दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये पदव्युत्तर पदवी देखील मिळवली होती.आर्मस्ट्राँग यांनी १९७१ मध्ये यूएस स्पेस एजन्सी नासा सोडली आणि विद्यार्थ्यांना स्पेस इंजिनीअरिंगबद्दल शिकवण्यास सुरुवात केली. नील त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत हृदयाच्या आजाराशी झुंज देत होता. २५ ऑगस्ट २०१२ मध्ये, आर्मस्ट्राँगचे वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनरी बायपा शस्त्रक्रियेमुळे उद्भवलेल्या गुंतागुंतांमुळे निधन झाले.
२० जुलै १९९६ हा क्षण मानवाच्या नेहमी लक्षात राहील . ” माणसासाठी एक पाऊल , मानव जातीसाठी एक उत्तुंग झेप ‘ चंद्रविर नील आर्मस्ट्राँग ने सांगितलेले हे शब्द इतिहासात नेहमी अजरामर राहतीले !
— अथर्व डोके.
संकेतस्थळ – vidnyandarpan.in.net
संपर्क – ७२७६१३३५११
Leave a Reply