अमुक झालं किंवा तमुक केलं की “त्याची गच्छन्ति” अ ”टळ” आहे …..
असं म्हणता म्हणता … ….
“टळटळीत” …….. ऊन पडून गेलं
“टाळ्या” ….. वाजवून झाल्या
“टाळे” बंदी ….. करून झाली
“टोळ” धाड ……. येऊन गेली
वाव ”टळ”……… झोडपून गेलं
“टाळ” कुटत …. …. घरी बसून झालं
चहा”टळ” पणा. … …. करून झाला
र”टाळ” आयुष्य ……. जगून झालं
इतकंच नाही तर …
कं”टाळा” सुद्धा बिचारा ….. येऊन येऊन कं”टाळ”ला ..
घराबाहेर पडायला “टाळाटाळ” करून झाली ..
एकमेकांना भेटणं ….. कटाक्षानी “टाळ”लं..
क”ष्टाळू” कामगारांचं ……. हातचं काम गेलं …
अनेक उद्योगांना कायमचं ….”टाळं” लागलं
अर्थव्यवस्थेचं पार ……वा”टोळं” झालं ..
कपाळावर Fever Gun नी …… अदृश्य “टिळे” लावून झाले….
तरीही हे कोरोनाचं संकट “टळता टळत” नाहीये…..
स्वतःच्याच अंगाला हात लागला …..तरी वि”टाळ” झाल्यासारखं वाटू लागलंय ….
प्रत्येकाच्याच शरीर आणि मनाभोवती ……त्यानी घट्ट वे”टोळं” करून ठेवलंय …..
अजून किती जणांच्या “टाळू” वरचं लोणी खाऊन जाणार आहे हा ????
म्हणूनच Morning walk असो किंवा भाजी , सामान वगैरे आणणं …
आम्ही मात्र सगळीकडे मोठ्ठी “टोळी” करून जातो …
“तो” अचानक समोर आलाच आणि आपण एकटे पडलो तर ???…….
उगाच आयत्यावेळेस नसता घो”टाळा” नको ना व्हायला ….
बाकी …आज न उद्या त्याचा नायनाट होणं ssss ….. “अ ”टळ” आहे… “अ ”टळ” आहे… !!!!!!!
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply