लाभले , भोगले सारेच वैभव..
उगाच कशाला हव्यास आता..
येता जाता , बंद रिकाम्या मुठी..
दृष्टांत हा जगी जगता जगता..।।..१
जीवन , खेळ कठपुतळीचा..
नाचवितो सर्वां तो अनामिक..
दोर सारेच फक्त त्याच्या हाती..
स्मरावे , त्याला जगता जगता..।।..२
जन्मा सोबती सावलीच मृत्यू..
अंती , हेच अटळ सत्य सृष्टीचे..
जगी येणे मोकळे जाणे मोकळे..
आसक्ती , जीवा कशाला आता..।।..३
क्षणक्षण आनंदाने झेलीत जावे..
सद्विवेकाचे , भान अंतरी जपुनी..
मना मनाला नित्य सांधित जावे..
प्रीतभावनांना उधळता उधळता..।।..४
लडिवाळ वेल्हाळ हास्य लाघवी..
स्पर्श रेशमी अलवार कुरवळणारे..
दाहक , दुःख वेदनांना शमविणारे..
लाभावे या जगती जगता जगता..।।..५
©️वि.ग.सातपुते ( भावकवी)
? *9766544908*
रचना क्र. ७४ / १० – ६ – २०२१
Leave a Reply