गंध तव केसांचा आजही तसाच येत आहे
जरी डोकावतीय रुपेरी छटा त्यात कधीतरी
मस्ती आपल्या प्रेमाची आजही तशीच आहे ।
चाल आपुली जराशी झालीय मंद जरी
ऊमेद चालण्याची ती आजही टिकून आहे
गजरा केसात माळण्याची हौसही तशीच आहे ।
फेसाळणारा सागर किनारा आजही तोच आहे
सागराच्या लाटांचा आवाज अजूनही तोच आहे
प्रेमलाटेतील आवेश तुझा आजही तसाच आहे ।
वाटते या सागर किनारी आजही तसेच बसावे
घेऊनिया मिठीत तुजला प्रेमगीत मी तेच गावे
गात असता प्रेमगीत या जगाला विसरून जावे ।
— सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
८ ऑगस्ट २०१८