नवीन लेखन...

अति राग

सीमा एक शिक्षिका. शांत आणि समाधानी. एका कडक शिस्तीच्या मध्यमवर्गीय मोठ्या कुटुंबातील. कसलेही लाड नाहीत. आवडनिवड सांगायची नाहीत अशी कडक शब्दात तंबी दिली जायची. घरामध्ये सगळ्यांना कपडे आणणे हे चुलत्याचे वडील होते वयाने म्हणून. नवू वारी साड्यांचे जोड. झगे. परकर पोलक्या साठी दोन रंगाची छिटाचे तागे. मुलासाठी खाकी व दोन रंगाचे कापड. धोतर जोड असे एकदम यायचा बस्ता आणि ज्याला जे दिले जायचे ते मुकाट्याने घेणे. अशा वातावरणात वाढलेल्या होत्या म्हणून अगदी साधे सुती फिकट रंगाची काठा पदराची साडी नेसून शाळेत जायच्या. त्यामुळे सगळ्यांना त्यांची आवड आवडायची. पण एकदा काय झालं त्यांचे अहो एका मोठ्या शहरात गेले होते तेव्हा येताना साडी आणली होती. आल्यावर सांगितले साडी आणली आहे तुझ्या साठी. सीमाला खूप आनंद झाला. नवऱ्याने साडी आणली म्हणून. पण घाईघाईत बघू म्हणून पेटी उघडून बघणे हे योग्य नाही अशी शिकवण. मग ती साडी त्यांनी दिल्या वर उघडून पाहिली होती तर…. भडक शेंदरी रंग. त्यावर आडवे काळे पट्टे. आणि निळ्या रंगाची फूले असलेल्या साडीला पाहून खर तर त्यांना कसे तरी झाले. आवडली तर मुळीच नाही. पण तसे दाखवले नाही छान आहे म्हणून ठेवली. दुसर्‍या दिवशी शाळेला जाताना ते म्हणाले नेसून जा आज. त्यामुळे नाईलाजाने आज्ञा पाळली. शाळेत मैदानावर प्रार्थना सुरू झाली. पण प्रत्येक मुलीचे व शिक्षिकांचे लक्ष या साडी कडे. आपले मत लगेच शब्दात सांगण्याची पद्धत नव्हती. म्हणजे जसे आजकाल वॉव काय मस्त वगैरे वगैरे. सीमाच्या लक्षात आले. संध्याकाळी घरी आल्यावर अगदी आठवणीने विचारले काय म्हणाले सगळे साडी पाहून. इथे इगो जास्त होता. मी आणली साडी याचा. सीमा छान आहे म्हणाले सगळे. आणि चांगला मूड मध्ये आहे म्हणून सहज म्हणाली. रंग थोडा हलका असायला हवा होता आणि ते पट्टे नको होते. झालं आकाशपाताळ एक करून तणतणत म्हणाले उद्या सकाळी ती साडी चुलीत टाक. यापुढे तुला कधीही साडी आणणार नाही. झक मारली आणि… बरेच काही बोलून राग व्यक्त केला. आणि खरच आयुष्य भर त्यानी साडी आणली नाही की पैसे सुद्धा दिले नाहीत. उलट कधी कुणी साडी बद्दल सांगितले की लगेच म्हणायचे. मला साडी आणणे समजत नाही. आणि मी आणलेली साडी तिला आवडत नाही..असे म्हणून मोकळे. आता सीमाने कुणाकुणाला खर काय आहे ते.. .
राग येतो हे खर आहे प्राण्यांना देखिल राग येतो. पण त्याचा अतिरेक करणे. मनात डूख धरणे हे बरोबर नाही. पुष्कळदा

अशा घटना ऐकण्यात येतात आणि शेवटी ती व्यक्ती आत्महत्या करु शकते. राग येतो पण किती काळ तो मनात ठेवावा याचे भान ठेवले पाहिजे. परत कधी तरी सीमाला तिच्या मनासारखी साडी आणली असती तर. आपण उगाच बोललो ही टोचणी जन्म भर लागून राहिली नसती.दोघांनाही. नवऱ्याने माहेरी पाठवले नाही म्हणून आत्महत्या. अगदी लहान वयात असलेले मुल सुध्दा एखादि वस्तू मिळाली नाही म्हणून आत्महत्या. म्हणजे अतिरागच…
धन्यवाद

–सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..