फार दिवसांनी एका सोसायटीत काही समवयीन बायकांनी एक छोटासा समूह तयार केला आहे. इथे फक्त आपल्या समस्या. सुख दु:ख याचीच चर्चा करायची आणि मार्ग शोधून एकमेकांना मदत करतात. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने आपले अनुभव सांगत होते. सुधाताई म्हणाल्या काय हो मालतीताई दोन दिवस कुठे आहेत? म्हणजे आला नाहीत म्हणून. तशा त्या म्हणाल्या की काय झालं परवा संध्याकाळी अचानक सूनबाईंचे भाऊ भावजय दोन मुलांना घेऊन आला होता. म्हणजे अचानक असे वाटते पण बहुतेक ते अगोदरच ठरलेले असते. त्यामुळे रात्रीचे जेवण बाहेर जाऊन केले. आम्हाला सकाळचे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी इडली सांबार चटणीचा बेत होता म्हणून दुपारी साधे जेवण. नंतर बाहेर फिरायला गेले. खाऊन झालेच असेल बाहेरचे. संध्याकाळी पाणीपुरी. आयस्क्रीम मागवले होते म्हणून रात्रीचे जेवण हलकेफुलके. दुसर्या दिवशी सकाळी भावजयीच्या मदतीने गोडधोड बाहेरचे मागवले व स्वयंपाक केला फार श्रम पडले नाहीत. परत दिवस भर बाहेर बाहेरचे खाणे आणि घरात साधेच जेवण… ज्या दिवशी गावी जाणार होते म्हणून लवकरच उठून फक्त अंघोळ करून आणि आम्ही यांना पार्किंग मध्ये जाऊन निरोप देतो असे सांगून परस्पर कोपर्यातील हॉटेल मध्ये नाश्ता चहा उरकून आले. आम्ही घरात केलेला नाश्ता चहा घेतला..या उलट जवळपास राहणारी माझी भाच्चीने दिवाळी संपल्यावर यांना जेवायला बोलावले होते कारण तिच्या कडे सासरचे लोक आले होते. तेव्हा हे गेले नाहीत कारण काय सांगितले होते माहिती आहे का तो म्हणाला मी विसरुनच गेलो होतो पण आठवण झाली म्हणून आलो जेवण झाले आहे तरीही थोडेसे खाईन. आणि घरी कुणी तरी असावे व आईबाबांना जेवायला वाढायचे असते म्हणून ती आली नाही. एरव्ही बाहेर जेवायला जातात दर दोन दिवसांनी किंवा फिरायला जातात चार आठ दिवस तेव्हा वाढून घेऊन जेवतोच की आम्ही आता सांगा बरोबर आहे का ते?… यावर उपाय काय हे पुढील भेटीत असे ठरले….
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात चुलत. मावस आत्तेभाऊ शिवाय मानलेले भाऊबहिणी असायचे. आणि भाऊबीजेला कोणताही भाऊ कोणत्याही बहिणीकडे जायचा. घरातील मोठय़ा पंगतीला भाऊ जेवायला बसायचा. सासूबाई म्हणायच्या अग भावाला तेल लावून उटण लावून अभ्यंग स्नान घाल. पाट. रांगोळी कर. आणि त्याच्या ताटाजवळ समयी. ऊदबत्ती लाव. आणि मोठ्या आग्रहाने त्याच्या आवडीचे पदार्थ करुन आगत्याने स्वागत केले जायचे. संध्याकाळी बहिणी बरोबरच तिच्या जावांना देखिल एकेक सूर्ती रुपयाची ओवाळणी. येतांना डब्यात फराळाची रेलचेल व सासूबाईंना पीस ओटी. जातांना अगदी तसेच दिले जायचे. खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद होता. काय दिले किमतीचे दिले याला महत्व नव्हते. भाऊ येणे हे महत्वाचे होते..
आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव म्हणून त्याचे आगत्य केले जाते. आजही ग्रामीण भागात अजूनही जेवायला बसलेले शेतकरी अनोळखी माणसाला देखिल जाणाऱ्या व्यक्तीला या जेवायला पाहुणे असे म्हणतात रामराम करतात. आणि ती व्यक्ती सुद्धा तितकाच प्रतिसाद देताना म्हणतात की घ्या देवाचे नाव रामराम. म्हणजेच सहज हवन होते नाम घेता फुकाचे. त्यामुळे जेवताना आपण म्हणतो ना वदनी कवळ घेता… सांगायचे तात्पर्य काय तर आता हे सगळे हळूहळू कमी होत आहे. नोकरी मुळे लांब व विभक्त कुटुंब आहे म्हणून आणि सगळे व्यवहारी जगात वावरताना दिसतात. वेड्या बहिणीची माया वेडीच असते पण भाऊ मात्र वेडा नाही.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply