ATM मधून पेसे काढणे हे आता आपल्याला काही नवे राहिले नाही. सध्या बर्याचजणांचा महिन्याचा पगारच बॅंकेत जमा होतो आणि बॅंकेत जाउन वेळ घालवण्यापेक्षा ATM मधून १० मिनिटात पेसे काढण्याकडेच सगळ्यांचा कल असतो. परत ATM मधून नोटापण कोर्या करकरीत मिळतात. बर्याचशा बॅंकाही आता एका ठराविक रकमेपर्यंतची रोख रक्कम काढायला ATM चा वापर करायला लावतात. त्यांना काय… स्टाफ कमी बसवायला लागतो.. त्यांच्या खर्चालाही कात्री लागते.
पण आता मात्र या ATM मधून पैसे काढताना सावध रहायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खोट्या किंवा duplicate नोटा मिळण्याचा धोका या ATM मध्ये वाढलाय आणि अशा खोट्या नोटा मिळाल्यावर कोणाकडे तक्रारही करण्याची सोय राहिली नाही. आपल्याकडे अशी एखादी जरी खोटी नोटी आली आणि ती आपण बॅंकेत घेउन गेलो तर कॅशियरबुवा पहिले ती नोट ताब्यात घेणार आणि चलनातून बाद करणार….
म्हणजे खोट्या नोटा बनवणार देशद्रोही मंडळी आणि त्या बाद करणार बॅंका. मधल्यामध्ये भरडणार आपण…. सामान्य माणसं.
Advt1Right
नुकतीच ठाण्याच्या एका मोठ्या बॅंकेच्या ATM मधून बाहेर आलेली ही नोट बघा. रंगाचे पॅच नको त्या ठिकाणी छापले गेलेत. आपण अडचणीच्या वेळेत घाईघाईत एखाद्या ATM मधून असे पेसे काढले आणि अशी नोट मिळाली तर काय करायचं. ही नोट कोणी घेणारही नाही आणि पुन्हा पैसे काडायचे म्हटले तर अकाउंटमध्ये बॅलन्स तर हवा?
म्हणजे हे फुकट बॅंकांतून मिळणारं ATM Card म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशातलाच प्रकार आहे.
— बातमीदार
Leave a Reply