नवीन लेखन...

आत्मा (भयकथा)

लॉकडाऊन २०२० मध्ये लिहिलेली भयकथा 

रुग्णवाहिका टॅणॅ टॅणॅ करत जोरात आली..सगळीकडे धावपळ सुरू झाली … .एक रक्तबंबाळ तरूणी होती…विव्हळत होती…. अपघाताची केस होती …
“खूप रक्त गेलय, पेशंटला ऑपरेशन थिएटर ला घ्या … .ऑक्सिजन लावा… .चला पटपट”… .डॉ. सुनीता म्हणाली …
“डॉ. मी तिची जुळी बहिण, आमचा रक्तगट सारखा आहे… .मी देते रक्त… पण काहीही करा आणि माझ्या बहिणीला वाचवा…. ” पेशंट ची जुळी बहिण आवेगाने बोलत होती….
ती रक्तबंबाळ मुलगी, विव्हळत होती, “डाॅ मला वाचवा….माझ्या खूप गोष्टी अपूर्ण आहेत…डाॅ…”
थोड्याच वेळात सुनीता बाहेर आली आणि म्हणाली “मला माफ करा…I am sorry, मी नाही तिला वाचवू शकले….”
पेशंट ची जुळी बहिण ओरडायला लागली …. ”तुम्हीच मारलं माझ्या बहिणीला … .ती तुम्हाला सोडणार नाही….तिच्या खूप इच्छा अपूर्ण आहेत….”.
तिच्या नातेवाईकांनी तिला शांत करुन, तिला तिकडून नेलं….
सुनिताला प्रचंड धक्का बसला… .जुळी बहिण आणि तिच्यावरचं प्रेम ती समजू शकत होती…
सुनीता आणि अनिता दोघी जुळ्या बहिणी… एम.बी.बी.एस. पर्यत शिक्षण एकत्र झालं…पण पुढे एमडीला दोघींची
ताटातूट झाली.
सुनिता मुंबईला आली आणि अनिताला मिर्जेलाच एमडी ला प्रवेश मिळाला, घराजवळच…
सुनीता झाल्या प्रकाराने अस्वस्थ होती..तिनी अनिताला फोन लावला… ”अने अगं काशी आहेस? “सुने अगं काय झालं ..? सकाळीच तर बोललो आपण…”अनिता म्हणाली.
सुनितानी सगळा प्रकार अनिताला सांगितला… अनिता म्हणाली “अगं आराम कर, शांत हो… आपल्या प्रोफेशन मधे तर असं होतचं… पण काळजी घे”.
सुनिताच्या डोक्यातून ते विचार जातच नव्हते..ती खोली वर आली… रात्रीचे 2 वाजले होते… दर उघडुन ती खोली मधे आली … आपोआप लाइट लागला ,,, ती चपापलीच… बाथरूम मधे जाऊन तोंड धूवुन आरशात बघते तर काय… .ती मेलेली जुळी बहिण दिसली… सुनीताला दरदरून घाम फुटला … ती पळत बाहेर आली आणि तिनी समीर ला फोन लावला…”असशील तसा ये लवकर…” समीर पळतच आला….सुनिता चक्कर येऊन खाली पडली होती. समीरनी तिच्या तोंडावर पाणी मारलं…. सुनितानी झाला प्रकार समीरला सांगितला.
समीर तिचा प्रियकर नुक्ताच त्यांचा साखरपुडा झाला होता.
समीरनी तिची समजूत घातली तिला बळे बळे खायला घालून थोपाटत झोपवलं.
दुसर्या दिवशी समीरनी सुनिताच्या सगळ्या appointments रद्द केल्या. सुनीता आणि समीर दोघांनीच दिवस घालवला.
समीरनी सुनिताला बाहेर फिरायला नेलं, रात्रीचा बाहेरच खाण्याचा plan ठरवला.
सुनिता जरा सावरली होती. दोघेही Moonlight क्लब मधे गेले. मंद म्यूझिक चालू होतं … गार्डन च्या एका कोपर्यात एका ग्रुपची पार्टी सुरू होती… .
क्लिंक क्लिंक शॅम्पेन ग्लासेस अलगद एकमेकाला टेकत होते…
धुंद orchestra वर युगुलं चा चा चा करत नाचत होती…. सुनिताला भिती वाटत होती….
त्याच क्षणी आता ऑर्केस्ट्रा ड्रमवाला सिम्बलसचा झणझणा आवाज करत होता…..
तेवढ्यात सुनितानी वर पहिलं … बघते तर काय? तिच मेलेली जुळी बहिण … वेटर च्या रूपात… .सुनिता जरात ओरडली…. ’’ वाचवा वाचवा… समीर बघ ती मला मरायला आलीय… ..पळ लवकर…. ’’.
सुनिता गाडीकडे पळाली… समीरनी तिला धावत जाऊन पकडलं. समीर नी गाडी ऊघडली आणि दोघेही रूमवर परत आले. समीरनी सुनिताला समजावला आणि तिला झोपवलं.
पुढे दुसर्या दिवशी सकाळी समीर म्हणाला …. ”मी आपल्या सगळ्या appointments रद्द केल्यात….आपण
दोन दिवसांसाठी… माथेरानला चाललोय”.
सुनीता म्हणाली “अरे समीर पण… मी… माझ्या “. आता तू काहीच बोलू नकोस … तुला बदल हवाय… ताजतवानं वाटेल आपण चाललोय”… समीर म्हणाला.
पूर्ण दिवस दोघांनी मजेत घालवला. रात्री झोपालं असताना.. कसलासा आवाज झाला…
सुनिता ऊठली… खिडकी उघडुन बाहेर बघते तर काय…… तीच मेलेली मुलगी…… सुनीता जाम घाबरली…” समीर समीर ओरडू लागली.
समीरनी तिला शांत केलं. सुनीता म्हणाली .. ”चल आपण परत जावू मुंबईला …”
समीर आणि सुनीता दोघेही मुंबईला समीरच्या घरी आले.
समीरनी त्याच्या आईला झाला सगळा प्रकार सांगितला. आई म्हणाली “काळजी करु नकोस पोरी आपण काही मार्ग काढू यातून.
संध्याकाळी आई आणि सुनिता कुठेतरी बाहेर गेल्या.
आई म्हणाल्या “हे बघ सुनिता आपण जिकडे जातोय तिकडे उगाच काहीही प्रश्न
विचार नकोस, ते सांगतील ते ऐक”.
दोघी एका घरात शिरल्या. जिकडे तिकडे … धूपाचा वास पसरला होता.भयाण शांतता होती.
एका खोलीत एक वृृद्ध गृहस्थ बसले होते … .सुनिता आणि आई त्यांच्या समोर बसल्या.
त्यांनी सुनिताच्या डोक्यावर हात ठेवला अन् म्हणाले .. ”बाळ काळजी घे… माणसाच्या मरणोपरांत त्याचा आत्मा १४ दिवस फिरत राहतो .… एक आत्मा तुझ्या मागावर आहे…अजून आठ दिवस काळजी घ्यावी लागेल… हा अंगारा लावत जा घराबाहेर पडताना आणि ही पुडी सतत स्वतः बरोबर ठेव…”
सुनिताला काही कळलं नाही. पण नंतर लक्षात आलं की ती अपघातातील मुलगी जिला मी वाचवू शकले नव्हते…..ती जावून ६ दिवस झाले होते आणि अजून ८ दिवस बाकी आहेत…..बापरे ह्यांना सगळे कसे कळले??
तिला थोडं समाधान वाटलं !! तिने अंगरा लावला. तिला थोडं बरं वाटलं.
पुढच्या दिवशी सकाळी सुनिता तयार कामवर जायला…. सुनिता म्हणाली. ” आई आम्ही दोघेही निघतो खूप appointments आहेत आज…. ”.
समीरनी सुनिताला जवळ घेतलं आणि म्हणाला .. ”आताा कसं माझ्या बायकोसारखे वागलीस हे भूत,आत्मा काही नसतं….घाबरट !!”.
सुनिता म्हणाली .. ”आई आम्ही निघतो … आज मला रात्रपाळी आहे , मी रूमवरच resident होस्टेल वारच जाईन दुपारी आणि तिथेच राहीन आज..”
दोघेही निघाले. सुनिताला दुपारी मिरजेहून आई चा फोन आला… आई म्हणाली .. ”अगं सुने तू लवकर ये… अनी कही विचीत्रच वागतेय… म्हणते की तिला कोणी मुलगी दिसते रात्री … ती तिला मारायला येते असं वाटतं तिला… तू लवकर ये…”
सुनिताला काही कळेना….ती म्हणाली “मी उदया सकाळी येते आज मला रात्रपाळी आहे.”
तिला भिती वाटली की आता
त्या मेलेल्या मुली च्या आत्म्याला अनिता कशी सापडली ?…या विचारातच सुनिता हे सगळं समीरला कळवायला निघते….अंगार्याची पुडी टेबलवरच विसरून.
सुनिताी समीरची बराच वेळ वाट बघते….पण तो पण आॅपरेशन मध्ये असल्याचं कळतं तो पर्यंत रात्र होते. सुनिता विमनस्कपणे
रात्रपाळीसाठी निघते.
रुटीन कामं आटपून मग डॉक्टर रूम मधे येइतो १२ वाजतात.
सुनिता बरोबर तिच्या अवखळ Intern रश्मी आणि दुहिता असतात.
सुनीता त्यांना म्हणते “मी आता माझा शेवटचा राऊंड मारते आणि मग तुम्ही सांभाळा …”
त्या दोघी मोबाइलवर गेम खेळत बसल्या होता. रात्रीचेे 2 वाजले होते…
सुनिताला जिन्यावरुन उतरताना मागे कसलासा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले…. तर कोणीच नाही… आणि परत पुढे
पाहीलं तर… .ती जुळी मेलेली मुलगी… पांढर्या साडीत, मोकळे केस…
सुनिता पळत पळत डाॅक्टर रूम मधे येते आणि दार लावून घेत रश्मी आणि दुहिताला म्हणते… ” मी झोपते आता तूम्ही दोघी बघा… ”
रश्मी आणि दुहिता म्हणतात “ आता काय टाइम पास करायचा ???…”
त्या दोघी मग मजा म्हणून हळूहळू सुनिताच्या चेहर्यावर पावडर, काजळ अन् लिपस्टिक चोपडतात….आणि बसतात हसत.
रात्री २.३० च्या सुमारास .. जोरात रूमच दार ऊघडतं…रश्मी आणि दुहिता खूप घाबरतात…..आणि म्हणतात…” वारा आणि इथे…आता !!!..”
तेवढ्यात जोरात वार्याचा एक झोत एकदम आत येतो आणि, प्रथम सुनिताच्या एप्रन मध्ये शिरतो….आणि नंतर, सुनिताच्या चेहर्यावर घोंघावत निघून जातो….
तशा रश्मी आणि दुहिता घबरून तिथून पळून जातात…..सकाळी ६ वाजता समीरला घेऊन परततात..…
सुनीता झोपलेलीच असते. समीर सुनिताला ऊठवतो….
तेवढ्यात सुनिताला तिच्या आईचा फोन येतो … .”सुनिता अगं सुने किती फोन केले तूला? असशील तशी निघुन ये तू… अनी is no more”….नाही” सुनीता ओरडतेच “काय? कसा… ”
”आई म्हणाली.. तिला काल रात्री ताप चढला….रात्री २.४५ ला झोपेत…ती ओरडायला लागली… “मला वाचवा, मला वाचवा… मला नको मारूस…” आणि डाॅ. नी तिला पहाटे ३ वाजता मृत घोषीत केलं … ”
सुनिता ढसाढसा रडायला लागली…त्या मेलेल्या जुळ्या बहिणीच्या आत्म्यानी अनिता चा जीव घेतला….
काही दिवसांनी सुनिता आणि समीर ची आई परात त्या गृहस्थाकडे गेल्या… ते म्हणाले… ”तुम्ही अंगारा लावयला विसरलात…आणि तरी देखील तुमचं दैव बलवत्तर म्हणून चेहरा ओळखता न आल्यामुळे त्या आत्म्यानी तुमच्या सारखा दुसरा चेहरा शोधाला आणि……….”

मनिष भट
सी.बी.डी बेलापूर
२ मे २०२०

आम्ही साहित्यिक चे लेखक 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..