श्वासातुनी चिरंजीवी गंध तुझा
मखमली मयुरपिसी स्पर्श तुझा
तुच वेल सुकुमार या जीवनाची
कोवळ्या फुलांतुनी भास तुझा
पाकळी, परागकणी मकरंद तूं
निर्मळ सौंदर्यी साक्षात्कार तुझा
अंतरी तुच गंगौघ प्रीतभावनांचा
स्पंदनांनाही अविरत ध्यास तुझा
तुझे रूप असे स्वर्गसुंदरी सारखे
जणु निरागस ईश्वरीय अंश तुझा
ब्रह्मांडी हेच सत्यं शिवं सुंदरम
तिथेच रमतो आत्माराम हा माझा
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२४३
२०/९/२०२२
Leave a Reply