अणुशास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांचा जन्म २८ जानेवारी १९२८ रोजी तुंकुर (म्हैसूर संस्थान) येथे झाला.
राजा रामण्णा हे एक विख्यात अणुकेंद्रकीय भौतिकशास्त्रज्ञ होते. एक अतिशय परिपूर्ण तंत्रशास्त्री (टेक्नॉलॉजिस्ट), समर्थ प्रशासक, प्रेरक पुढारी, उपजत संगीतकार, संस्कृत पंडित आणि तत्त्वज्ञ होते.
राजा रामण्णा यांना शाळेपासून साहित्य व संगीतात रस होता. राजा रामण्णा ह्यांचे सुरूवातीचे शिक्षण म्हैसूर आणि बंगलोरमध्ये झाले. त्यांचे कुटुंब बंगलोरमध्ये स्थलांतरित झाले तेव्हा ते बिशॉप कॉटन स्कूलमध्ये रुजू झाले. शाळा, इंग्लिश पब्लिक स्कूल सिस्टिमचा एक भाग होती. १९४७च्या सुमारास राजा रामण्णा हे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून भौतिकशास्त्रात बी.एस्सी. आणि शास्त्रीय संगीतात बी.ए. झाले. नंतर १९४९च्या दरम्यान मुंबई विद्यापीठातून एम. एस्सी. व संगीतात पदव्युत्तर पदवी मिळवली. १९५४ साली, लंडन विद्यापीठातून अणुभौतिक पीएच. डी. मिळवली. तेथील आण्विक ऊर्जा संशोधन संस्थेतून ‘आण्विक इंधन व अणुभट्टी’बाबत ते तज्ज्ञ झाले. तेथे पाश्चात्य नृत्य, संगीत, वाद्यमेळाचे कार्यक्रम रस घेऊन पाहिले आणि पुढे जीवनभर ती आवड जपली. १९५६ मध्ये त्यांना पियानो वादनाबाबत प्रात्याक्षिकासह व्याख्यान देण्यास राष्ट्रीय अकादमीने बोलावले. त्यानंतर भारतात परतल्यावर बीएआरसीच्या (मुंबई) आण्विकशस्त्र प्रकल्पामध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून डॉ. रामण्णा काम करू लागले. १९५८ साली, त्या कार्यकमाचे ते प्रमुख संचालक झाले. पोखरणच्या (राजस्थान) सैनिकीतळावर भूमिगत चाचण्यांसाठी त्यांनी बांधकाम सुरू केले. अण्वस्त्र, इंधनाबाबतचा रचनात्मक कार्यक्रम १९७०च्या सुमारास डॉ. रामण्णांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. ही प्रगती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कानावर गेली. १९४७ मध्ये, अण्वस्त्र चाचणीस सज्ज असल्याचे डॉ. रामण्णांनी इंदिराजींना कळवले. पहिले अण्वस्त्रयान रामण्णांच्या पथकाने मुंबईहून पोखरणपर्यंत गुप्तता बाळगून वाहून नेले.
मे १९४७ च्या एके सकाळी, अण्वस्त्र चाचणी झाली. अण्वस्त्राचे सांकेतिक नाव होते, ‘हसरा बुद्ध.’ चाचणी स्थळाचे निरीक्षण करताना इंदिराजी, डॉ. रामण्णा व डॉ. होमी सेठना यांची छबी दुस-या दिवशीच्या दैनिकांमध्ये झळकली आणि डॉ. रामण्णांचे नाव साऱ्या जगात झाले. त्यावर्षीचा भारताचा नागरी सन्मान त्यांना लाभला.
१९७८ साली इराकचे सर्वेसर्वा सद्दाम यांनी डॉ. रामण्णांना आपल्या देशी वैयक्तिक अतिथी म्हणून बोलावले. अंति इराकसाठी अण्वस्त्र करून देण्यासाठी गळ घातली. या अजब मागणीने त्यांची झोप उडाली. लगेचच्या विमानाने ते परत भारतात परतले. त्यानंतर पाकिस्तानात झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र परिषदेत डॉ. रामण्णांनी युद्धाऐवजी अण्वस्त्राचा संरक्षणासाठी प्रतिबंधक म्हणून उपयोगावर भर दिल्यामुळे श्रोते प्रभावित झाले.
मार्च १९८१ सालचा रविवार होता तो! डेहराडूनच्या ‘डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन लॅब (ऊएअछ)’ मध्ये भारतातील विज्ञान तंत्रांविषयक सादरीकरणाला वाव देणाऱ्या व्याख्यानमालेत डॉ. रामण्णांनी पोखरण अणुचाचणी व तांत्रिक आव्हाने या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर डॉ. अब्दुल कलाम यांचे ‘पहिल्या भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाची व्यवस्थापन पद्धती’ यावर सादरीकरण झाले.
जेवणाच्या सुट्टीदरम्यान डॉ. रामण्णांनी कलामांकडे भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यादिवशी संध्याकाळी पाच वाजता झालेल्या भेटीत त्यांनी संरक्षणसंशोधन व रचना संघटनेच्या (ऊफऊड) क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे नेतृत्व करण्याचा आग्रह केला. या कार्यक्रमाच्या प्रयोगशाळेच्या संचालकपदाची धुरा वाहण्यासाठी आमंत्रित केले. संरक्षण विभागात पुन्हा परतायला मिळतंय याचा डॉ. कलाम यांना आनंद झाला.
डॉ. रामण्णांनी कलामांची निवड करूनही सध्याचे त्यांचे प्रमुख डॉ. सतीश धवन यांना कलाम नव्या वातावरणाशी जुळवून घेणे कितपत जमेल याबाबत साशंक होते. पण त्यावेळी धवन यांचे मित्र डॉ. रामशेषन कलामांच्या साहाय्यास पुढे आले. त्यांना संमिश्र पदार्थाच्या विकासात डॉ. कलामांना रस असल्याचे माहीत होते. त्यामुळे डॉ. कलाम ही नवी जबाबदारी यशस्वीरीत्या पेलतील असा विश्वास त्यांनी दिल्याने डॉ. धवन हे त्यांना नवनियुक्तीवर पाठवण्यास राजी झाले. डॉ. रामण्णा, डॉ. धवन, डॉ. रामशेषन अशा गुरुतुल्य वरिष्ठांची डॉ. कलामांच्या नियुक्तीवर सहमती व्हावी हे डॉ. कलामांचे अहोभाग्य म्हणायचे! त्यानंतर १९८० नंतरच्या दोन दशकात, संरक्षणसंशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) डॉ. रामण्णा संचालक होते. १९९० साली ते पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री होते. १९९७ ते २००३ या कालावधीत डॉ. रामण्णा राज्यसभेच खासदार होते. २००० साली ते संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते. १९९१ साली त्यांनी ‘यिअर्स ऑफ पिजग्रिमेज’ हे आत्मचरित्र लिहिले आणि १९९३ साली ‘पौर्वात्य व पाश्चात्य संगीतरचना’ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके डॉ. रामण्णांचे विचार जगापुढे प्रकाशित करून गेले.
डॉ. राजा रामण्णा यांचे २४ सप्टेंबर २००४ रोजी निधन झाले.
Leave a Reply