सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.
क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.
झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.
ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.
Leave a Reply