नवीन लेखन...

देवपूजेतील साधन – नारळ

Auspicious Things Used For Devpooja - Coconut (Naral)

श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना विड्याच्या पानावर नारळ ठेवतात. विशेष म्हणजे देवघरात ठेवलेले नारळ शुभकार्याचे प्रतीक आहे.

याशिवाय कोकणवासियांना नारळ अतिशय प्रिय असून सागराने आपल्यावर कृपा करावी म्हणून ते सोन्याचाही नारळ त्याला अर्पण करतात. नारळाचे पाणी औषधी असून ते सेवन केले असता बध्दकोष्ठ नाहीसा होतो. देवाला जो नैवेद्य दाखविला जातो त्यातही नारळाच्रा खोबर्‍याचे विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ गणेशाला आवडणारे मोदक.

विविध प्रकारच्या भाज्यांमध्येही नारळ किसून घालतात ज्यामुळे भाज्या चवदार होतात. नारळाच्या करवंटीपासूनही अनेक वस्तू बनवतात.

1 Comment on देवपूजेतील साधन – नारळ

  1. Devgharatil kalsaver naral kasa tevtat.naral kalsavar ubha teu naye to dole aslela bhag pujya Karnarya vektikade asava.ase Dharm granthat sangitale aahe.mhanun naral kalsavar plet madhe tandul bharun paltha tevava ka.plese sanga.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..