देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते.
देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे.
फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले जातात.
स्त्रिया आपल्या केसांच्या वेणीत फुलांचा गजरा करुन माळतात.
फुलांपासून निरनिराळ्या प्रकारची अत्तरे बनवतात. त्या अत्तराचे थेंब कपड्यावर टाकल्यास त्यांच्या वासाने मन प्रसन्न होऊन शरीर उत्तेजित होते.
फुलपुडी
Leave a Reply