निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात.
निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे.
निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो.
सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.
Leave a Reply