सागरातून निर्माण झालेला शंख श्रीविष्णूने वध केलेल्या शंखचूड राक्षसाचे प्रतीक असून देवपूजेत याला मानाचे स्थान आहे. शंखाच्या मूलभागात चंद्र, कुक्षामद्ये वरुण, पृष्ठभागी प्रजापती आणि अग्रभागी गंगा व सरस्वती निवास करतात. पंचजन्य नाव असलेल्या शंखाला श्रीविष्णूने आपल्या हाती धरले आहे म्हणून शंखाला अग्रपूजेचा मान मिळाला असून त्याच्यामध्ये स्नान घालताना साठणारे जल सर्व देवांवर शिंपडण्यात येते.
महाभारतातील युध्दप्रसंगी शंखाचा रणवाद्य म्हणून उपयोग केल्याचे आढळून येते तर देवपूजेच्या वेळीही शंखनाद केला जातो, ज्याच्या ध्वनीमुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होऊन एकाग्रता लाभते. म्हणून देवघरात शंख असणे भाग्याचे लक्षण आहे.
Leave a Reply