घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे.
एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते.
दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी धार्मिक कार्ये यशस्विरीत्या पार पाडली जातात.
आजकाल गणपतीच्या मंदीरात नारळाचे तोरण बांधल्यास गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा रुढ झाली आहे. नवर्यामुलाला व मुलीला त्यांच्या विवाह प्रसंगी बाशिंग बांधले जाते हे सुध्दा एक प्रकारचे तोरण असून त्यामुळे त्या दोघांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अथवा बाधा येत नाही.
तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा अर्थ गृहीत धरला जातो.
Leave a Reply