सूत्रसंचालक, लेखक व अनुवादक डॉ. सुनील देवधर यांचा जन्म २१ जुलै १९५६ रोजी झाला.
डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले.
त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे.
डॉ. देवधर यांनी आकाशवाणीत हिंदी कार्यक्रमांना वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यात ‘कलश’, ‘बडे अनमोल है गीतों के बोल’, ‘जिंदा कहानिया’ यांचा विशेषत्वाने उल्लेख करता येतो. डॉ. देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अभी अभी आया वसंत’ या डॉक्युमेंटरीला ‘ऑल इंडिया रेडिओ’चा प्रथम पुरस्कारही मिळाला आहे.
अनुवाद व मौलिक लेखन या संदर्भात त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सहायक संचालक म्हणून आकाशवाणी पुणे केंद्रावरून निवृत्त झाल्यानंतर डॉ. देवधर हे विविध महाविद्यालये, विद्यापीठे यात अतिथी प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर सूत्रसंचालक, अनुवादक म्हणूनही त्यांची ओळख आहे.हिंदी भाषेच्या विकास व संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ उत्तर प्रदेशच्या हिंदी संस्थानच्या वतीने दर वर्षी विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
२०१८ मध्ये हिंदी भाषेच्या विकास व संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी डॉ. सुनील देवधर यांना ‘सौहार्द पुरस्कार’ मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply