लेखक अशोक कुमार बैंकर यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९६४ रोजी मुंबई येथे झाला.
अशोक कुमार बँकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय लेखक. त्यांच्या लेखनात गुन्हेगारी थ्रिलर्स, निबंध, साहित्यिक टीका, कथा यांचा समावेश असतो. त्यांचे आठखंडी रामायण विशेष गाजलं.
अशोक बँकरनी लिहिलेली ४२ पुस्तके ५८ देशांच्या १६ भाषांतून भाषांतरित झाली असून त्यांच्या २४ लाख प्रती विकल्या गेल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांवर आधारित मालिका आल्या आणि गाजल्या आणि आता फिल्म्स येत आहेत.
आजवर अशोक बँकर यांची एक लाख ऐंशी हजार पुस्तके ईपुस्तकांच्या स्वरूपात विकली गेली आहेत. म्हणजे त्यांची छापील पुस्तके जेवढी विकली गेली त्याच्या तुलनेत नऊ टक्के.
अशोक बँकर हा बहुधा बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करणारा पहिला मोठा भारतीय लेखक असावा. १९९५ च्या सुमारास जेव्हा भारतात इंटरनेटचा वापर मोठय़ा प्रमाणात होण्यास प्रथमच सुरुवात झाली तेव्हापासून बँकर यांनी आपले लिखाण वाचकांशी ऑनलाईन शेअर करायला सुरुवात केली. भारतीय लेखकाचे पहिले ई पुस्तक, पहिली धारावाहिक कादंबरी आणि पहिली मल्टीमीडिआ कादंबरी हे सर्व काढण्याचा मान अशोक बँकरना जातो. डिजिटल प्रकाशनामध्ये हे असे आणि आणखी कितीतरी प्रयोग त्यांनी आजवर केले आहेत. भारतीय प्रकाशकांच्या धिमेपणाला कंटाळून त्यांनी स्वत:च आपल्या स्वत:च्या वेबसाइटमधून ई-पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित आणि वितरित करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी स्वत:चे ई- पुस्तक स्टोअरच काढले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply