तुला बर्ट्रॉड रसेल माहित आहे का..
मी तिला विचारले ..
खरे तर ते तिच्या मेंदूच्या पलीकडचे होते..
तरीपण मी विचारले..
काय , कोण होता ..
एक लेखक , त्याने मॅरेंज अँड मॉरल्स ‘ लिहिले
खरे तर ती सायन्स स्टुडन्ट
तरी पण म्हणालो त्या पुस्तकात एक कन्सेप्ट
आहे त्याबद्दल त्याच्या मुलीने म्हणजे
कॅथरीन ने ‘ माय फादर ‘या पुस्तकात
नीट सांगितली.
कोणती होती….ती म्हणाली..
एक्सचेंज वाईफ .
आयला सॉलिड इंटरेस्टिंग माणूस आहे..
लगेच तिने गुगुल वर सर्च मारले
तिला कळले त्याचे शेवटचे पाचवे लग्न
त्याच्या वयाच्या ८० व्या वर्षी झाले.
साले काय आपले पूर्वज होते,…
मी कपाळावर हात मारला..
येडी पूर्वज काय ..
आताच शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
म्हणे पूर्वज..
ए पुस्तक वाचणार …
ती म्हणाली …
मी म्हणालो …नुसतेच वाच ?
तिने नुसतेच बघीतले …तिच्या नजरेत
मी येडा आहे हे जाणवले.
आम्ही दोघे आय टी मध्ये काम करतो.
असेच व्हाट्स अप ग्रुपवर ओळख झाली.
तशा माझ्या बऱ्याच ओळखी झाल्या..आणि ब्रेक अपही झाले
तिचेही तसेच..लागला स्टॉपर की
मार कचकचून ब्रेक..
असे आमचे दोघांचे लाईफ होते.
खरे तर आय टी वाले फारसे लग्नाच्या भानगडीत पडत नाहीत आम्हीही पडणार नाही हे निश्चित ..
वीक एन्डला भेटतो..एन्जॉय करतो..
पण नो लग्न आम्हाला ते पचणार नाही..
आयुष्यभर एकाजवळ रहावयाचे हाऊ
डिस्गस्टिंग …असे आमचे दोघांचे मत…
एक आहे..
फालतू खर्च करणे टाळतो…मी तरी
पगार मला मजबूत ..तिलाही तसाच..
आम्ही दोघांनी ठरवले…
भरपूर पैसे कमवायचे ..
परंतु नो लग्न…
त्याच्या व्याजात
एक हायफाय ..वृद्धाश्रम गाठायचा..
जर आम्ही ब्रेक अप न होता राहिलो तर..
पुढचे माहित नाही..तिचेही माहित नाही काय करेल ते
आपले मात्र फिक्स…
साला नो झंझट …
— सतीश चाफेकर.
Leave a Reply