नवीन लेखन...

लेखक जयंत राळेरासकर

ध्वनिमुद्रिका संग्राहक, लेखक जयंत राळेरासकर यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.

आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले. व सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर्स, सोलापूर शाखेचे सचिव म्हणून त्यांचे सोलापुरात त्यांनी काम सुरु केले. जयंत राळेरासकर सृजन फिल्म सोसायटी, सोलापूरचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहेत. वाचन, लेखन, संगीत ऐकणे यातून त्यांनी पाच ते सहा हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला.

जयंत राळेरासकर यांचा रेकॉर्डस् जमवणे हा छंद असल्याने त्यासाठी गावोगावी फिरणे आलेच. आपल्या पुस्तकात आणखी त्यांनी हृद्य आठवण ते लिहिली आहे. कोणती गोष्ट कुठे सापडेल हे सांगता येत नाही. त्यांचे मित्र सुधीर पेशवे – हे तुळजापूरचे एक ध्वनिमुद्रिका संग्राहक. नळदुर्गच्या आठवडे बाजारात हिंडताना एका चहाच्या टपरीकडे त्यांचे लक्ष गेले. दोरीला लटकत असलेली “चहा – २५ पैसे” असे लिहिलेली ती वर्तुळाकार चीज एक रेकॉर्डच होती. कुणाची आहे म्हणून त्यांनी ती जवळ जाऊन पाहिली. सुधीर पेशवेंचा डोळ्यावर विश्वास बसेना. ती ध्वनिमुद्रिका होती विष्णुपंत पागनीस यांची. चित्रपट ‘संत तुकाराम’आणि गीत होते -आधी बीज एकले ! चार चहांची किंमत देवून त्यांनी ती हस्तगत केली.

आपल्या पुस्तकात आणखी एक हृद्य आठवण ते लिहितात –’सोलापूरच्या विजापूर रस्त्यावरील रेल्वे लाइनच्या कडेला पसरलेल्या झोपडपट्टीत राहणारे मल्लपा स्वतः सैगलप्रेमी. कुडाच्या भिंतीपाशी त्यांनी सैगलच्या या तबकड्या रचून ठेवल्या आहेत. जमिनीपासून छतापर्यंतचा हा डोलारा पाहून आम्ही हतबुद्धच झालो. मिणमिणत्या प्रकाशात मल्लपाकडे पाहत आम्ही त्या मुद्रिका उलटसुलट करून पाहत होतो.

या माणसाने या वेडापायी घरातले कपाट विकले. जबरदस्त स्मरणशक्ती. लांबूनही ते सहज कोणती रेकॉर्ड आहे हे सहज ओळखत होते. कुंदनलाल सैगलला बघितल्याचा आनंद त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. ८०, ८१ वयात बाबुल मोराच्या आठवणीनी ते हळवे झाले. त्यांनी बहुतांशी रेकॉर्डस आम्हाला दिल्या पण आम्ही व्यापारी नाही रसिक आहोत ही खात्री पटल्यावर.

अशाच एका भेटीत ते म्हणाले, “साहेब, घरापर्यंत नळ आणून द्या आणि सगळ्या रेकॉर्डस घेऊन जा. “ आज मलप्पा नाहीत पण माझ्याकडे असलेल्या सैगलच्या ध्वनिमुद्रिकांवर त्यांची आठवण जिवंत आहे. ‘माझ्याकडे ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आहे,’असे न सांगता सर्वाना तो विविध माध्यमांतून, जाहीर कार्यक्रमांतून, तसेच रेडिओच्या अनेक कार्यक्रमांतून रसिकांना उपलब्ध करून दिला.

आज पर्यंत जयंत राळेरासकर यांनी २३४ कार्यक्रम जाहीरपणे केले. जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी यांचा आकाशवाणी सोलापूर वर सातत्याने ४००-५०० कार्यक्रमात सहभाग राहिला आहे. अनेक केंद्राने ते कार्यक्रम घेतले आहेत. राळेरासकर यांचा सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सहकार्यातून संगीत संग्रहालयाच्या उभारणीत सहभाग राहिला आहे. तिथे सध्या डिजिटायझेशनचे काम करीत आहोत. त्या मुळे अनेक दुर्मीळ संगीत आणि आवाज यांचे जतन होत आहे. त्यांचे हे कार्य फारच महत्त्वाचे आहे. आज ते सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयातील सर्व कार्यक्रमांचे आयोजन जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी हे करत असतात. सोलापूरच्या मेहबूबजान या गायिकेला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न हे वैयक्तिक हातून झालेले मोठे काम आहे. महाराष्ट्र टाईम्स, स्वरविहार.. गांधर्व महाविद्यालयाचे मुखपत्र इत्यादी मध्ये त्यांचे लिखाण प्रसिध्द झाले आहे.

‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ आणि ‘आनंदयात्रा’ अशी जयंत राळेरासकर यांची दोन पुस्तके प्रसिध्द झाली आहे. ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ या जयंत राळेरासकर यांच्या पुस्तकात संगीतक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांचा रंजक इतिहास जयंत राळेरासकर यांनी ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत ‘मधून सांगितला आहे. तर ‘आनंदयात्रा’ हे जयंत राळेरासकर यांचे जुन्या चित्रपटगीतांवर आधारित पुस्तक आहे. त्यांचे इतर ललित लिखाण,कथा लोकसत्ता, तरूण भारत, नवरंग रुपेरी, मैत्र, तारांगण, मधून प्रसिध्द झाले आहे. आशय” या साहित्यिक दिवाळी अंकाच्या संपादनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे.

— केशव साठ्ये.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..