मुल्कराज आनंद यांचा जन्म १२ डिसेंबर १९०५ मध्ये पेशावर यथे झाला , जे आता पाकिस्तानात आहे. त्यांचे शिक्षण खालसा कॉलेज अमृतसर येथे झाले. उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिज विद्यापीठात लंडनला झाले. जात-पात, उच्च नीच पणा याचा अनुभव त्यांनी खूप जवळून घेतला. त्याच्याच परिवारातील चाचीला बहिष्कृत केले होते का तर तिने एका मुस्लीम महिलेबरोबर अन्न खाल्ले होते. त्याचा परिणाम असा झाला की त्या चाचीने आत्महत्या केली. त्यांचे एका मुस्लीम तरुणीवर प्रेम होते परंतु तिचे लग्न दुसरीकडे केले. ह्या दोन घटनांमुळे ते खूप व्यथित झाले. त्यांना ह्या घटनामुळे खूप धक्का बसला आणि त्यातून त्यांची सुप्रसिद्ध ‘ अनटचेबल ‘ ही कांदबरी १९३५ साली निर्माण झाली.. एका दलित तरुणावर ही कांदबरी आधारलेली आहे. शौचालय साफ करणाऱ्या एका तरुणाची ही गोष्ट आहे. दलितच दलितांच्या व्यथा मांडू शकतात असे तोपर्यंत मानत कारण कोणत्याही उच्च जातीच्या लेखकाने इतकी जळजळीत कांदबरी लिहिली नव्हती. ही कांदबरी भारतात आणि भारताबाहेर इतकी गाजली की मुल्क राज आनंद यांना भारताचा ‘ चार्ल्स डिकन्स ‘ म्हणून म्हणू लागले. विशेष म्हणजे ह्या पुस्तकाची प्रस्तावना त्यांचे मित्र , जगप्रसिद्ध लेखक ई . एम . फ्रॉस्टर यांनी लिहिली होती. त्यावेळी मुल्क राज आनंद यांची ओळख फ्रॉस्टर यांच्याशी टी . एस. ईलियट यांच्या पत्रिकेत ‘ क्रायटेरियोन ‘ येथे काम करताना झाली.
भारतातील स्वातंत्र्य चळवळीत मुल्क राज आनंद यांनी भाग तर घेतलाच परंतु आपली लेखणीही चालवली. त्यानी गुलामीचा विरोध विश्वव्यापी पद्धतीने केला. मुल्क राज आनंद स्पेनमध्ये तेथील गृहयुद्धाच्या बातम्या करण्यासाठी पत्रकार म्हणून गेले , त्याचप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात त्यानी बी. बी.सी. चे स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केले , तेथे त्यांची भेट जगप्रसिद्ध कादंबरीकार जॉर्ज ऑरवेल यांच्याशी झाली. जॉर्ज ऑरवेल यांनी मुल्कराज आनंद यांच्या ‘ दी सोर्ड एंड दी सिकेल ‘ ह्या कांदबरीची समीक्षाही केली आणि त्यांच्या लेखनशैलीची प्रशंसाही केली.
इंग्लंडमध्ये रहात असताना मुल्कराज आनंद यांनी ‘ दी वीलेज, एक्रास दी ब्लैक वाटर ‘ ही कांदबरी लिहिली. दक्षिण आशियाच्या संस्कृतीवर खूप पुस्तके लिहिली. पार्शियन पेंटिंग, करीस एंड अदर इंडियन डीसेस , सेवन लिटिल-नोन वर्डस ऑफ दी इनर आई ‘ ही पुस्तके लिहिली आणि एका भारतीय लेखकाला तेथे जो वाचकवर्ग मिळत होता तो उच्च स्तरातील होता हे महत्वाचे .
१९४६ नंतर मुल्क राज आनंद भारतात परत आले आणि त्यानी ‘ दी कुली ‘ ही सुप्रसिद्ध कांदबरी लिहिली . त्या कांदबरीमध्ये १५ वर्षाच्या बाल मजुरी करणाऱ्या मुलाची आणी त्यात फसलेल्या मुलाची कथा आहे. त्यांनी एक पुस्तक आपल्या आत्मकथन शैलीत लिहिले आहे त्याचे नाव ‘ दी प्राइवेट लाइफ ऑफ एन इंडियन प्रिंस ‘ . तसे पाहिले तर त्यांची आत्मकथनात्मक कांदबरी चार खंडात प्रसिद्ध आहे. तिचे नांव ‘ सेवन एजेज ऑफ मैन ‘ असे आहे. त्यांना त्यांच्या ‘ मॉर्निंग फेस ; ह्या पुस्तकाला साहित्य अकादमीने अवार्ड दिले आहे. मुल्क राज आनंद यांनी द व्हिलेज , ऍक्रॉस द ब्लॅक वॉटर , द बिग हार्ट , द रोड , टू लिव्ह्स अँड बड अशी अनेक गाजलेली पुस्तके लिहिली.
सत्तर च्या दशकात मुल्क राज आनंद यांनी आय. पी. ओ . या प्रगतीशील आंतरराष्ट्रीय संघटनेशी जोडलेल्या इन्सबर्ग मध्ये दिलेले वक्तव्य ‘डॉयलग एमोंग सिविलायजेशन’ ह्या नावाने प्रसिद्ध झाले. महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरू , रवींद्रनाथ टागोर यांच्या मानवतावादी विचारांची मुल्ये त्यानी सांगीतली. वर्ल्ड पीस कौन्सिलने मुल्क राज आनंद यांना ‘ पीस प्राईज ‘ दिले तर भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देवून त्यांचा सन्मान केला.
मुंबईला ते एका कार्यक्रमात ते आले होते तेव्हा त्यांचे भाषण झाले तेव्हा त्यांना पहाता आले त्यावळी त्यांचे वय ८५ वर्षाच्या पुढे होते त्यावेळी मला त्यांची स्वाक्षरी मिळाली.
मुल्क राज आनंद यांनी विपुल लेखन केले त्यात इतिहास , कला , साहित्य , राजनीती , सामजिक व्यंग , आणि समाजातील विद्रुपता हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते. त्यांनी इंग्रजीत विपुल लेखन केल्यामुळे त्यांना देशव्यापी प्रसिद्धी मिळालीच परंतु परदेशातही प्रसिद्धी मिळाली. मुल्कराज आनंद यांना इंग्रजी भाषेमधील लेखकांमध्ये जे भारतीय लेखक आहेत त्यांच्यामधले संस्थापक म्हणून मानले जाते.
अशा विश्वविख्यात भारतीय लेखकाचे पुण्यात वयाच्या ९९ व्या वर्षी २८ सप्टेबर २००४ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply