विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे मराठी लेखक निरंजन घाटे यांचा जन्म १० जानेवारी १९४६ रोजी मुंबईत झाला.
निरंजन घाटे यांनी लिहिलेल्या आणि संपादित केलेल्या पुस्तकांची संख्या आजच्या घडीला १८५ आहे. प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांनी आजपावेतो जे स्तिमित आणि अचंबित करणारं जबरदस्त वाचन केलंय, त्यावर प्रकाश टाकणारं ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ हे रंजक पुस्तक लिहिलं आणि तेही प्रचंड लोकप्रिय झालं.
आदिवासींचे अनोखे विश्व, अग्निबाणांचा इतिहास, अमेरिकन चित्रपटसृष्टी, आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान, आरोग्य गाथा, असे घडले सहस्रक, असे शास्त्रज्ञ अशा गमती, आश्चर्यकारक प्राणिसृष्टी, भविष्यवेध, ज्ञानदीप, ज्ञानतपस्वी, गमतीदार विज्ञान, घर हीच प्रयोगशाळा, गुन्हेगारीच्या जगात, जगप्रसिद्ध विज्ञानकथा, जल झुंजार, कळसूत्री, खगोलीय गमती जमती, खाणं पिणं, मृत्यूदूत, मुलांचे विश्व, ऑपरेशन सद्दाम, प्रदूषण, रहस्यरंजन, रोबॉट फिक्सिंग, संभव असंभव, स्वप्नचौर्य, स्वप्नरंजन, स्वयंवेध, तरुणांनो होशियार!, दॅट क्रेझी इंडियन, उल्का आणि धूमकेतू, वसुंधरा, विज्ञान संदर्भ, विज्ञानाने जग बदलले, विसाव्या शतकातील विज्ञानमहर्षी, यंत्रमानवाची साक्ष, ११ सप्टेंबर, आई असंच का? बाबा तसंच का?, अदभुत किमया, आधुनिक युद्ध कौशल्य, आधुनिक युद्धसाधने अशी त्यांची अनेक पुस्तकं वाचकप्रिय आहेत.
त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार, मो. वा.चिपळूणकर पुरस्कारासह आठ वेळा राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
Leave a Reply