मराठी संतांचे चरित्र कादंबर्यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार रवींद्र सदाशिव भट यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३९ रोजी झाला.
साहित्याइतकीच अध्यात्माचीही ओढ असणाऱ्या रवींद्र भट यांनी एकूण १४ कादंबऱ्या, पाच नाटके, सहा काव्यसंग्रह व चित्रपट, अनुबोधपट, बालवाङमय असे विपुल लेखन केले. इंदायणी काठी, सागरा प्राण तळमळला, भगीरथ, आभाळाचे गाणे, देवाची पाऊले, भेदिले सूर्यमंडळा या त्यांच्या कादंबऱ्यांना वाचकांची विशेष पावती मिळाली होती.
नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत. भट यांनी एस.पी कॉलेजमधून बी. ए. केले, त्यानंतर त्यांनी १९६८-८० या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नोकरी केली. १४ वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह काम केले. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना.ह.आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते.
रवींद्र भट यांचे २२ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply