कर बाबाजी पाटील यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२६ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात पट्टण-कोडोली येथे झाला. त्यांचे सुरवातीचे शिक्षण हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावी आणि गडहिंग्लज येथे झाले. कोल्हापूरच्या राजाराम विद्यालयातून त्यांनी बी. ए . ची पदवी मिळवली. पुढे त्यांनी बी. टी . ची पदवी मिळाली. रयत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती. त्यांची त्यांच्याशी दर्जेदार आणि नवीन पुस्तकासंबंधी चर्चा व्हायची . शंकर पाटील यांनी इंग्रजी साहित्याचादेखील अभ्यास केला होता. त्या काळातील अनेक दर्जेदार साहित्यविषयक मासिकांमुळे सुरवातीच्या काळात ते अधिकाधिक प्रगल्भ होत गेले.
ग. वि . अकोलकर आणि ग.प्र . प्रधान यांच्या सहकार्याने त्यांनी ८ वी ते १० वी ह्या इयत्तांसाठी ‘ साहित्य सरिता ‘ या वाचनमालेचे संपादन केले. ते मराठी आणि अन्य सहा भाषांतील पाठयपुस्तकांसाठी विद्यासचिव म्हणून नियुक्ती झाली होती.
शंकर पाटील यांनी १९४७ पासून कथा लेखनाला सुरवात केली जवळजवळ सतरा वर्षानंतर ते कांदबरी लेखनाकडे वळले. त्यांची ‘ टारफुला ‘ ही कांदबरी १९६४ साली प्रसिद्ध झाली. त्यांच्या निवेदन शैलीतील ग्रामीण बोली भाषा सर्व वाचकाना आपलीशी वाटते. त्यांच्या निवेदन शैलीचे विनोद आणि त्यातील गंभीर आशय आणि कथेचा प्रभावी ओघ वाचकांना विचार करायला लावतात.
त्यांनी ‘ कथा अकलेच्या कांद्याची ‘ , ‘ लवंगी मिरची कोल्हापूरची ‘ आणि ‘ गल्ली ते दिल्ली ‘ ही तीन वगनाट्ये खूप गाजली. त्यांचा ‘ पाऊलवाटा ‘ हा ललित लेखसंग्रह असून त्यांनी ‘ सत्याग्रही ‘ नावाचे नाटक लिहिले आहे. त्यांच्या ‘ वळीव ‘ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. हा त्याच पहिला कथासंग्रह होता.
शंकर पाटील यांची कथाकथनाचे अनेक कार्यक्रम झाले. द. मा. मिरासदार , व्यंकटेश माडगूळकर यांच्याबरोबर त्यांनी गावोगावी जाऊन कथाकथनाचे कार्यक्रम केले. मला आठवतंय आम्हीही शाळेत असताना अनेक वेळा त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला जात असू . शंकर पाटील यांची गोष्ट रंगवून सांगण्याची पद्धत अस्सल ग्रामीण होती. त्यांची पैज आणि मिटींग ही कथा त्यांच्या तोडून ऐकताना खूपच धमाल उडत असे. त्यांची ‘ धिंड ‘ ही कथा ते इतक्या फ़र्मासपणे सादर करत . आजही त्यांच्या ह्या आणि अशा अनेक कथा गावोगावी कॅसेट , सीडी , आयपॉड च्या माध्यमातून आईकल्या जातात. त्यांचे भेटीगाठी, बावरी शेंग , खुळ्याची चावडी , पाहुणी हे कथासंग्रह असून त्यांनी फक्कड गोष्टी , खेळखंडोबा, ताजमहालामध्ये सरपंच हे विनोदी लेखन केले. त्यांच्या लेखनात स्त्री-चित्रणाला विशेष महत्व दिले आहे परंतु त्याचप्रमाणे त्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती आणि त्यांचे ते निरीक्षण त्यांच्या कथांमधून जाणवते. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचे संवाद लेखन आणि पटकथा लेखन शंकर पाटील यांनी केले. त्या काही चित्रपटांची नावे एक गाव बारा भानगडी , वादळवाट, युगे युगे मी वाट पहिली , गणगौळण, वावटळ , पाहुणी , पिंजरा , भुजंग , भोळीभाबडी अशी आहेत . त्यांचा ‘ पिंजरा ‘ हा चित्रपट खूप गाजला. आजही त्यांतील संवाद अनेकांच्या समरणात आहेत .
शंकर पाटील यांनी महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ ह्या संस्थांमध्ये मोलाचे योगदान दिले . १९८५ मध्ये नांदेड इथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले.
अशा जबरदस्त कथा लेखकाचे 30 जुलै १९९४ रोजी निधन झाले .
— सतीश चाफेकर.
Leave a Reply