विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ मध्ये ट्रिनिनाद च्या चगनवास येथे झाला. त्यांच्या परिवाराचे नांव नेपाळ देश या नावावर आधारित आहे . ज्याप्रमाणे नायपॉल म्हणजे नेपाळचे असाही होतो. असे म्हणतात की त्यांचे पूर्वज गोरखपूर येथील भूमिहार ब्राह्मण होते ज्यांना त्रिनिनाद घेऊन गेले . कदाचित हे त्यांनी नेपाळ सोडण्यापूर्वी हे घडले असेल. त्यांचे वडील शिव प्रसाद नायपॉल हे ‘ त्रिनिनाद गार्डियन ‘ मध्ये वार्ताहर होते. व्ही. एस. हे विद्या नायपॉल या नावानी ओळखले जातात काही जण त्यांना सर विद्या असेही म्हणतात. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड येथे झाले. त्यांना त्रिनिनाद सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती . नायपॉल याना शिक्षणासाठी यूरोपमधील कुठलेही कॉलेज निवडण्याची मुभा होती म्ह्णून त्यांनी ऑक्सफर्ड निवडलॆ. त्यांच्या पुस्तकांवर टीका होत होती परंतु ती ‘ मनी मेकर्स ‘ ठरत नव्हती . लंडनच्या वर्तुळत त्यांचा प्रवेश होत नव्हता परंतु अंतोना फ्रेजर ही त्यावेळी कादंबऱ्या , रहस्यकथा लिहीत होती आणि तिचे पती राजकीय वर्तुळात होते त्यांच्यामुळे ब्रिटिश उच्च वर्तुळात नायपॉल ह्याचा शिरकाव झाला , त्यामध्ये ब्रिटिश राजकीय पुढारी, लेखक , कलाकार यांचा समावेश असे . त्यांच्या मदतीने ७,२०० पॉन्डचे चे कर्जं नायपॉल याना मिळवून दिले तेव्हा त्याची पत्नी पॅट आणि त्यांनी एक घर तेथे विकत घेतले. त्यांनतर त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या . त्यांना २००१ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला तर त्यांना ‘ सर ‘ हा किताब देखील मिळाला आहे. नायपॉल यांचे लिखाण नेहमीच वादग्रस्त ठरले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली परंतु त्यांचे खाजगी आयुष्य देखील वादग्रस्तच राहिले. त्यांनी अ हाऊस ऑफ बिस्वास , अ बेन्ड इन द रिव्हर , द एनिग्मा अरायव्हल , मिगुल स्ट्रीट , इन अ फ्री स्ट्रीट , द मिमिक मेंन , हाफ ऑफ लाईफ , द मायस्टिक माससुर , इंडिया अ वंडरफूल सिव्हिलायझेशन , अ वे इन द वर्ल्ड , द ओव्हरक्राउडेड अशी अनेक पुस्तके लिहीली. अनेक वेळा त्याच्यावर आरोप झाले की की ते अँटी-मुस्लिम आहेत. काही वर्षांपूर्वी त्याना मुबंईत लिट फेस्टचे अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आले , त्यावरून बराच वादंग उठला होता , त्या कार्यक्रमात बहुतेक आदल्याच दिवशी गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या विरुद्ध काही विधाने केली होती . नायपॉल यांची त्याच फेस्ट मध्ये मुलाखत झाली त्यावेळी मी तेथे होतो , वातावरण थोडे तप्त झाले होते. कारण वर्तमानपत्रातून बरीच उलट-सुलट चर्चा झाली होती. ते आता परत भारतात येतील की नाही याबद्दल माझ्याप्रमाणे अनेकजण आजही साशंक आहेत. हल्ली त्यांचे वय झाल्यामुळे ते व्हील चेअर शिवाय फिरू शकत नाहीत. एकंदरीत व्ही. एस .नायपॉल हे व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिले आहे कदाचित त्यांची अनेक विधाने पुढेही वादंग निर्माण करतील. त्यांना १९७१ चे सुप्रसिद्ध बुकर अवॉर्ड देखील मिळाले आहे. काही वर्षांपूर्वी त्याच्या कादंबरीवर ‘ द मायस्टिक माससुर ‘ नावाचा चित्रपट आला होता त्यात असिफ मांडवी ( मांडवीवाला ) , ओमपुरी , जिमी मिस्त्री , संजीव भास्कर आणि आयेशा धारकर ( अनिल धारकर यांची मुलगी ) यांनी काम केले होते. नायपॉल यांचा लेखनाचा प्रवास हा खूप मोठा आहे . त्यांच्याबद्दल लिहावयाचे म्हटले तर अनेक घटना , त्यांचा स्वभाव , त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यकती , त्यांची लग्ने हे सर्व सामान्य माणसाच्या विचाराच्या आवाक्याबाहेरचे आहे असेच म्हणावे लागेल. मनस्वी माणसाच्या प्रेमात अनेक स्त्रिया पडतात तसेच नायपॉल यांच्या बाबतीत झाले परंतु घटस्फोट झाल्यानंतर त्या पुस्तके लिहितात , आणि ती पुस्तके गाजतात असेही म्हटले जाते. व्ही. एस. नायपॉल यांना कवी नामदेव ढसाळ यांच्याबद्द्दल , त्याच्या कवितांबद्दल आदर होता , ते एके ठिकाणी म्हणाले होते नामदेव ढसाळ त्यांच्या कवितांनी मला आश्चर्यचकित केले ते त्याच्यामधील प्रामाणिक अनुभवानी . व्ही. एस. नायपॉल यांच्यासारखा माणूस समोरून बघायला , आईकाला मिळणे हे काय कमी आहे , खरे सांगायचे झाले तर सर विद्या नायपॉल नावाची दंतकथा त्यांच्या हयातीतच सुरु झालेली होती .. व्ही. एस. नायपॉल यांचे ११ ऑगस्ट २०१८ रोजी त्रिनिनाद टोबॅको येथे निधन झाले..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply