विनायक सदाशिव वाळींबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईमध्ये झाले तर माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यामध्ये झाले. विद्यार्थिदशेपासून त्यांचा कल पत्रकारितेकडे होता. त्याचप्रमाणे त्यांचा राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभाग होता. इ.स. १९४८ साली गांधीहत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधातल्या सत्याग्रहात वाळिंब्यांनी सहभाग घेतला. त्यासाठी त्यांना तीन महिने येरवडा कारागृहात बंदी ठेवण्यात आले होते. १९४८ मध्ये ते ‘ अग्रणी ‘ मध्ये आणि पुढे १९५० ते १९५४ या काळामध्ये ते ज्ञानप्रकाश, प्रभात, लोकशक्ती या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी नोकरी केली. त्यांनी १९६२ पर्यंत अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. १९६२ मध्ये ते पहिल्यांदा उपसंपादक म्हणून आणि त्यानंतर रविवार आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी केसरी मध्ये काम केले.
वि. स. बाळींबे १९६५ साली पत्रकारितेच्या अभ्यासासाठी लंडनला गेले. तेथील अनुभव त्यांनी सह्याद्री मासिकामध्ये लिहिले. १९६७ मध्ये ते बी. ए. पास झाले. १९६८ मध्ये त्यांचे ‘ व्होल्गा जेव्हा लाल होतो’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांचे हे पुस्तक खूप गाजले. केसरीत असताना पत्रकारितेच्या प्रशिक्षणासाठी ते कार्डिफ येथे गेले होते. इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पण त्यांचे या विषयांवरचे लेखन कधी इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या भरात क्लिष्ठ, कोरडे आणि कर्कश झाले नाही, की इतिहासाला जिवंत, थरारक करण्याच्या नादात भावविवश किंवा भावगौरवात्मकही झाले नाही. त्यांनी १९७१ मध्ये केसरी चा राजीनामा दिला.
वाचनीयता आणि रसवत्ता जराही उणावू न देता अभ्यास आणि कष्ट यांनी निवडून, पारखून दिलेला तपशील उत्तम रीतीने मांडण्याचे कौशल्य वाळिंबे यांच्या जवळ होते. घटना – प्रसंगांचे अंत:प्रवाह शोधणार्या त्यांच्या बारकाव्यात ते आहे, मोठ्या पार्श्वपटावर लहान घटना पाहण्याच्या जाणकारीत आहे, संदर्भांची विविधता आणि त्यातून घटना-प्रसंगांना मिळत जाणारी दिशा यांकडे लक्ष पुरवण्याच्या त्यांच्या दक्षतेत आहे आणि व्यक्तीच्या मर्मस्थानांविषयी अतिशय कुतूहल बाळगणार्या त्यांच्या प्रगल्भ जीवनदृष्टीत आहे.
१९७८ ते १९८२ ह्या कालखंडामध्ये ते इंडियन इन्स्टिटयूट ऑफ एज्युकेशनचे प्रकाशन विभागप्रमुख होते. १९८९ मध्ये ग. वा. बेहरे यांच्या ‘ सोबत ‘ चे ते संपादक होते. बाळींबे यांची बंगलोर ते रायबरेली, इंदिराजी ही पुस्तके विशेष गाजली. त्यांनी मोठ्या माणसांच्या मोठेपणाची अनेक अंगांनी उकल करण्याचा प्रयत्न केला. मानवी मर्यादांचे, दौर्बल्याचे, मोहप्रवणतेचे भान ठेवून त्यांनी जागतिक पातळीवरची महत्वाची व्यक्तिमत्त्वे लेखनविषय केली. चांगल्या जाणत्या, तयारीच्या बहुश्रुत अशा वाचकाचेही समाधान करणारी गुणवत्ता त्यांच्या लेखनात प्रकट झाली आणि ती शेवटपर्यंत अखंड टिकूनही राहिली.
त्यांची इस्रायलचा वज्रप्रहार, तीन युद्धकथा, स्टॅलिनची मुलगी, पराजित अपराजित, एडविना आणि नेहरू, दुसरे महायुद्ध हिटलर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय घटनांची माहिती देणारी प्रकाशित झाली ती पुस्तके खूपच गाजली ती त्यांच्या त्रयस्थ आणि तटस्थ लेखन पद्धतीमुळे. हिटलर किंवा त्यांचे सावरकर किंवा त्यांचे नेताजी वाचताना त्यातले प्रसंगनाट्य अक्षरश: खिळवून ठेवते.
इतिहास आणि तो घडवण्यात अग्रेसर असणारी मोठी माणसे यांचे जबरदस्त आकर्षण वि.स.वाळिंबे यांना होते आणि तीच त्यांच्या लेखनाची प्रेरणा होती. पण त्यांचे या विषयांवरचे लेखन कधी इतिहासाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करण्याच्या भरात क्लिष्ठ, कोरडे आणि कर्कश झाले नाही, की इतिहासाला जिवंत, थरारक करण्याच्या नादात भावविवश किंवा भावगौरवात्मकही झाले नाही.
वाळिंबे यांनी अनेकांची चरित्रे लिहिली त्यांपैकी राजमाता विजयाराजे शिंदे यांचे आत्मकथन, आणि युवराज म्हणजे रणजितसिंग यांचा मुलगा दुलिपसिंग यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी विशेष उल्लेखनीय आहेत. प्रसंगातले नाट्य अचूक टिपण्याच्या त्यांच्या मार्मिकतेमुळे वाचकाला अपूर्व समाधान मिळते. विधता आणि त्यातून घटना-प्रसंगांना मिळत जाणारी दिशा यांकडे लक्ष पुरवण्याच्या त्यांच्या दक्षतेत आहे आणि व्यक्तीच्या मर्मस्थानांविषयी अतिशय कुतूहल बाळगणार्या त्यांच्या प्रगल्भ जीवनदृष्टीत आहे.
वि. स. वाळींबे यांनी सुमारे ४५ पुस्तके लिहिली. त्यांनी नाणी पालखीवाला यांच्या ‘ फ्रिडम अँट मिडनाइट ‘ या पुस्तकचा ‘ मध्यरात्रीचा स्वातंत्र्यसूर्य ‘ ह्या नावाने अनुवादही केला. त्याचप्रमाणे ‘ सातवे सोनेरी पान ‘ या नावाने वि. रा. मंकेकर यांच्या पुस्तकाचा अनुवादही केला. वाया गेलेली वर्षे, भारत विकणे आहे, हे नेते जनतेचे, इंदिरा गांधींचे साक्षीदार, इन जेल ही त्यांची अनुवादित पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. कुलदीप नायर यांच्या ‘ इन जेल ‘ पुस्तकाच्या अनुवादाने साहित्यविश्वात खूपच खळबळ उडाली होती. ते पुस्तक खूप गाजले.
मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकणाऱ्या वि. स. वाळींबे यांचे २२ फेब्रुवारी २००० मध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply