शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ : कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक महाराष्ट्राला घडविणारे एक महत्त्वाचे शिल्पकार आहेत. भाऊराव पाटलांचा जन्म २२ सप्टेंबर १८८७ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळातील कोल्हापूर संस्थानातल्या हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पायगौंडा देवगौंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते. […]