नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची

गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ! “पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही. […]

आरोग्य धनसंपदा

ध्यान धारणा ही ,शांतता मनाची आरोग्य धनाची, गुरुकिल्ली || सात्विक आहार, कंद मुळा भाजी खावी रोज ताजी, सर्वकाळ || ॠषीतुल्य झाड, पिंपळ उंबर वड हो अंबर, महाराजा || वृक्ष करीतसे, धरती श्रृंगार ही हिरवीगार, दिसतसे || पहाटे उठणे, करा रोज योग सरतील भोग, शरीराचे || शुद्ध हवा पोटी, रोग हे सरेल आनंद भरेल, गगणात || राखा […]

रामदासी मी

श्रीराम प्रभू माझ्या मनी असे कंदकृर्ती ग्रामी मज दिसे एकच मुखी नाम असे श्री राम जय राम जय जय राम चैत्र शुद्ध नवमीला यात्रा भरे रामभक्तांना सुखावह करे भोगी सुख रामगण सारे श्री राम जय राम जय जय राम राम स्वयंभू जागृत स्थान असे पवित्र गोदाकाठी रममाण दिसे राम भक्ती शिवाय माझे जीवन कसे श्री राम […]

नमामि गंगे

उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता. […]

“सुपर फुड” चुलीवरची दूध भाकर…

ज्वारी व बाजरी या धान्याला अमेरिकेने नाईलाजाने का होईना सुपर फुड म्हणून मान्यता दिली आहे.2023 हे वर्ष जग जागतिक भरड धान्य milet वर्ष म्हणून साजरे करीत आहे…ज्वारी बाजरी ही धान्ये आपण सिंधुसंकृती पासून आपल्या आहारात वापरत आहोत.. […]

एकमेव जयते….

सर्वच दैनिक,’सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक’ असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,’गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण’ दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते. ‘आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव नेता ‘ असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. ‘पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी’ अशा हजारों कंपन्या असतांना निर्धास्तपणे लिहिले जाते. तसेच ‘थंड रस मिळण्याचे एकमेव […]

कथातरंग – अनुपच्या शब्दात सल्ला

साधारण पांच एक वर्षांपूर्वी धोंडीबा कडे सहा एकर बागायती शेती होती, आणि शेताच्या एका कोपर्‍यात तीन खोल्यांचे छोटेसे पण देखणे असे कौलारू घर होते. त्यात धोंडीबा, राधा आणि त्यांची एक मुलगी राहत असे. दिवसभर कष्ट करून त्याने हे माळरान नंदानवनात फुलवले होते. कोणाकडे काही मागायची गरज पडणार नाही अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. […]

टीव्हीच्या आठवणी…

पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं.. […]

ओसाड जमीन

ब्रिटीश कवी T. S.Eliot यांच्या Waste Land या कवितेने प्रेरित होऊन मी लिहलेली ओसाड जमीन ही कविता   कित्येक गढूळ लोंढे प्रत्येक ऋतूत शहराच्या गल्लीबोळात शिरतात रिकाम्या निर्जन शांततेच्या सागरात चेहरा नसलेली धक्का खात फिरतात पेरणी करून अथवा तरव्यासाठी कोवळं पेटवूनही येथे प्रेतांना धुमारे फुटतच नाहीत खाली मान घालून अंत्ययात्रेत सुतक पाळणारे एकमेकांना ओळखू येतीलच असे नाहीत […]

मी आणि माझं ‘सुशि’ प्रकरण….

माझ्याप्रमाणे, माझ्यासारख्या लाखो वाचकांच्या मनावर अजूनही राज्य करणारे शब्दप्रभू. स्वर्गीय लेखक , साहित्य गंगेच्या प्रवाहात वाचकांना न्हाऊ घालणारे शब्दशिरोमणी. […]

1 16 17 18 19 20 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..