दिल्ली नावामागचा इतिहास
दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय. […]