नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

संकल्प

का करतो आपण संकल्प ?केवळ नवीन वर्षात आपण काही करणार आहोत हे इतरांना सांगण्यासाठी ,दाखवण्यासाठी -की खरोखरच आपण त्यावर गंभीर विचार करून आपल्या आयुष्याला एक निश्चित दिशा देण्याचा प्रयत्न करतो-एक सुनिश्चित मार्ग आखून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करत असतो.. […]

प्रतिबिंब

मधे एकदा एका ‘so called whatsapp गुरू’ कडून एक सुप्रभात संदेश आला होता. त्यात लिहिलं होतं की रोज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आरशात बघा… आणि त्यात दिसणाऱ्या स्वतःच्या प्रतिबिंबाला सांगा… ” You are the best. And I love you.” थोडक्यात काय तर स्वतःवर प्रेम करायला शिका… पण मग त्यासाठी आरशात कशाला बघायला हवं? आपण कसे दिसतो […]

विधीलिखित

कोणाला कोणच्या प्रसंगातून कोणत्या वेळी जावं लागतं ते विधिलिखित असतं. ते टळणार नसतं. त्यांतून किती जीव मनस्तापाने होरपळून निघतात. आपण सिरीयल्स मधून,कथा कादंबर्यातून हे बघतो, वांचतो पण मी प्रत्यक्षात घडलेली घटना इथे सांगत आहे. ( पात्रांची नांव बदलली आहेत) वैशाली ताईंच्या लग्नाचा वाढदिवस होता, संध्याकाळी बाहेर जेवायचं ठरलं होतं. मोठी मुलगी गांवातच होती, ती पण येणार […]

कला आणि समाज

समाजाभिमुख कला म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्यासाठी माझं विचारचक्र चालू झालं आणि त्यातून मला जे काही समजलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. […]

नातं कुठं गेलय ?

पृथ्वीचा जन्म झालं.त्यानंतर पृथ्वीतलावर हळूहळू सृष्टी निर्माण झाली. पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू वनस्पती यांची निर्मिती झाली.वेगवेगळ्या जीवांमध्ये मानव प्राण्याची निर्मिती झाली.मानव प्राणी हळूहळू विकसित होत राहीला. कदाचीत पूर्वी चार पायांवर चालणारा माणूस उत्क्रांत होत होत दोन पायावर चालू लागला. इतर प्राण्यापेक्षा मानावाचा मेंदूही जास्त विकसीत होत राहीला.निसर्गाच्या नियमाप्रमाणे बिनकामाचे अवयव नाहीसे झाले. पूर्वी कदाचीत एकटे […]

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज म्हणजे १० डिसेंबर या दिवशी निधन झाले. सुलोचना शामराव चव्हाण म्हणजेच सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ रोजी मुबंईत झाला. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव सुलोचना महादेव कदम असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मराठी चौथी पर्यंत झाले. वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली ” सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची ” ही लावणी […]

महान व्यक्ति अल्पायुषी!

बरीच महान व्यक्तिमत्वे अल्पायुषी झाली.आपले दैवत शिवाजी महाराज अवघ्या पन्नासाव्या वर्षी स्वर्गवासी झाले.सर्व शत्रूंचा बिमोड करून हिंदवी स्वराज्याला उर्जितावस्था येणार आणि त्याचवेळेस राजे स्वर्गवासी झाले.काय हा दैवदूर्विलास!त्याचे कर्तृत्व बहरतानाच हे असे व्हावे,आपले नशीबच फुटके झाले. अस काही महाराजांच्याच बाबतीत झाले असे नाही.भारताच्या इतिहासात अशी बरीच उदाहरणे दिसून येतात. विवेकानंद,आगरकर,सुभाषचंद्र बोस,थोरले बाजीराव,माधवराव पेशवे वगैरे अशी अनेक उदाहरणे […]

घंटा… आपल्या अगदी जवळची…

देवळात प्रथम तान्ह बाळ ऐकतं ,तेव्हा मोठा आवाज ऐकून घाबरून रडतं… नंतर थोडं मोठं झाल्यावर बाबांच्या कडेवरून हात उंचावून घंटा वाजवू शकतं तेव्हा समाधानानी हसतं .. आणि मग घंटा वाजवतच रहातं.. मग उड्या मारून हात पोचतो..घंटा वाजवतो.. नंतर कायम देवळात आलं की भक्तीभावानी घंटा वाजवलीच जाते.. हा एक संस्काराचा भाग होऊन जातो… तो आवाज सांगतो.. मनातले […]

“जोखीम”

आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता. […]

गोष्ट छोटी – दोन आज्यांची!

एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस […]

1 18 19 20 21 22 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..