नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

न पेलवी अर्थ

न पेलवी अर्थ न पेलवी शब्द लक्ष्यभेद न करी बरेचदा अर्थ… अर्थबोध न होता मनव्यापी मन शांतता मन तरंग शोषुन व्यर्थ उरतो प्रत्येकदा शोधित फिरतो त्या प्रेमळ जागा जया न विस्कटती तरल आकृतीबंध न करती त्रागा…. खरी कविता गवसते जेथे लयबध्द श्वास अन् मनाचे मौन वसते ! –डाॅ.दीपक सवालाखे, यवतमाळ,

फिरुनी केली मनात दाटी…

फिरुनी केली मनात दाटी जुन्या क्षणांनी टिपे जराशी झरुनी गेली गालावरुनी. जुन्या फुलांचा जुना सुगंध अवती भवती किती क्षणांची घुटमळ जुन्या रस्त्यावरती फिरूनी ओठावर येती पुन्हा जुनीच गाणी. किती रेशीम क्षणांचा गुंता गुंतत असता कुणी उसवला नाही मी पण व्यापून जाता पसा गतकाळाचा भरला तुटलेल्या धाग्यांनी. देठ तुटताना तेव्हा रडले होते पान पान असे उठले होते […]

नातं_असंही??

आधारवड रविवारची सकाळ, अनिकेत मस्त लोळत बेड वर आडवा झालेला, आज जरासा अळसावलेला! तस सॉफ्टवेअर मध्ये जॉब करणारे सगळेच शनिवार रविवार अशेच मुर्दाडासारखे पडून असतात! त्यात नुकतंच त्याच्या टीमच रिलीज झालेलं.काल रात्री तेच सेलिब्रेशन करून तो लेट नाईट आलेला! तो साखरझोपेतच होता तेच त्याची लाडाची लेक मुग्धा आली धावत आणि बसली अंगावर, घोडा घोडा चालू झाला! […]

साबुदाण्याची खिचडी

असा कोणी आहे का की ज्याला साबुदाण्याची खिचडी माहिती नाही ?माहिती तर सगळ्यांनाच असते पण हं, प्रश्न आवडीचा असतो. काहीजणांना खूप आवडत असते तर काहीजण आवडत नाही असं नाक मुरडून सांगतात. खरे तर साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे होत नाही, पण माझी खात्री आहे की ज्यांना ती आवडत नसते त्याचे मूळ कारण दातातल्या फटी असतात. त्या […]

कळेना

तू पाप की पुण्य ?….कळेना . तू स्वार्थ की परमार्थ ?…. कळेना. तू विष की अमृत ? ……कळेना. तू छंद की आसक्ती ?….कळेना. तू ध्यास की भास ?……. कळेना. तू आस की आभास ?……कळेना. तू नस की फास ?……कळेना. तू श्वास की भ्रमनिरास ?…..कळेना. तू मृगजळ की शाश्वत ?…… कळेना. तू शांती की तगमग ?……. कळेना. […]

कंदिलाचा मंद मंद प्रकाश

मी लहान असताना आमच्या रानात राहायला होतो त्यावेळी रानात गावात सुद्धा लाईट नव्हती. गावात ठराविक ठिकाणी ग्रामपंचायतीने बसवलेले रॉकेलचे दिवे होते. रानात तर भयानक अंधार माजलेला असायचा एखाद्यावेळी रातकिडे रात्रीच्यावेळी फिरत होते. या रात किडयाला आजी काजवा असे म्हणत. काजव्याच्या प्रकाशातून थोडे फार शेतीचे दर्शन व्हायचे. परंतु हेकिडे रात्रीच्या अंधारात मला सुंदर असे दिसत होते. आमच्या […]

मूर्तीपूजा : विविध धर्मातील फरकाचा एक मुद्दा !

मूर्तीपूजा ही पंचेद्रियांवर अवलबून असलेल्या माणसाच्या आकलनशक्तीची अगतिकता आहे. मूर्तिपूजक आणि मूर्तिभंजक या दोघांनीही जर हे सत्य समजावून घेतले तर दोघेही त्या विश्वनिर्मात्याची उपासना वेगवेगळ्या पद्धतीने करतानाही परस्परबंधुभाव सांभाळू शकतील. एवढेच नव्हे तर तो वृद्धिंगतही करू शकतील. […]

मी नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल…

हे पुस्तक वाचताना भान हरपल्यासारखे होते.. आणि पुस्तक संपताना खूप ओकबोकं वाटू लागत..अचानक एवढ्या मैत्रिणींच्या गराड्यातून व त्या निसर्गरम्य गावातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं.. लेखिकेचा हात सुटल्यासारखा वाटतो, इतकं ते अनुभव वाचतांना आपण एकरूप झालेलो असतो. वाचन संपतं परंतु त्या एकटेपणातही त्या मनोरम आठवणी ते प्रसंग मेंदूत घोळत राहतात.. मनात रेंगाळत राहतात. […]

चंदन

तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे? मीही नाही रे पाहिलं आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते हरवतो तो न जाणो किती दिवस. अगदी अगदी दडून बसतो अवचित मग कधी […]

विनती

देव निळाईत न्हाई देव राऊळात न्हाई शोध बापा माणसाच्या अंतरीच्या ठायी ठायी फुलं नि फळं ही सारी त्याच्या रं अंगणाची पुन्ना काय वाहतो तू वीणा भाव ती फुकाची नगं त्यास रं डोलारे सोन्यारुप्याचे मनोरे कशाची रं हाव त्याला त्याला दावू नगं गाजरे देणं घेणं हा व्येव्हार देवा काय रं कामाचा एक शबूद ओलेता डोळा थेंब आनंदाचा […]

1 20 21 22 23 24 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..