दिलासा
जराशी फुंकर जखमेवरली जराशाने मिळे दिलासा कुणीतरी हवेच असली बेगडी तर सहवास नकोसा नाती अपुली जमा करावी धन दौलतिची चिंता कशाला जिवाभावाची मैत्र जुळावी स्वार्थ विचारही नको वाऱ्याला प्रेम भुकेली आहेत सारी जिव्हाळ्याचे सूर जीवाला ऐकून घ्यावे कधी श्रोत्यापरी तेव्हढ्यानेही सुख मनाला असोत कमी नि अधिक काही कुणीही नाही पुर्ण जगाला वाटून घेऊ जे जे ठायी […]