मुक्त
झुगारून द्यावीत बंधने स्वतःची मनाची, तनाची नि बांधल्या बंधांची, अदृश्य बेड्यांची नि भावनिक गुंत्यांची! ओलांडून यावेत उंबरठे लोकलाजेचे मान नसलेल्या दाराचे नि नासलेल्या शेवाळी नात्यांचे! उधळून लावाव्यात शेजा रत्नमाणकांच्या हवा कशाला मोह त्या सोन्याच्या पिंजऱ्याचा पारतंत्र्यात हरवतात जाणिवा किमान जगण्याच्या! पेटवून द्यावेत लोळ तप्त आगीचे वडवानलाचे नि धगधगत्या निखाऱ्यांचे ओतावे स्वत्व त्यात बनण्या कणखर लोहाचे! तुडवावी […]