नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

जैत रे जैत 

गो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा. […]

छंद 

प्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं. […]

खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम

अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले. […]

व्याकरणाची ऐशीतैशी….

बरेच साहित्यिक सुध्दा यमक जुळवण्यासाठी व्याकरणाची वाट लावतात. मला कुणावर टीका करायची नाहीये. पण असे शब्द वापरल्याने ते रूढ होत जातात आणि पुढच्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम आढळतो. परिणामी भाषा बिघडते. पूर्वी थोडंसं शिक्षण घेणाऱ्यांचे सुध्दा भाषा आणि लिखाण व्याकरणदृष्ट्या अचूक आणि उत्कृष्ट असायचे. आता पदवीधरांचे सुध्दा नसते.  […]

समस्त दारू पिणार्‍यांना सादर अर्पण

।। विषय जरी दारु असला तरी ! ।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल ! ।। पिऊन थोडी चढणार असेल ।। तरच पिण्याला अर्थ आहे ।। एवढी ढोसून चढणार नसेल ।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे ।। मी तसा श्रध्दावान ।। श्रावण नेहमी पाळतो ।। श्रावणात फक्त दारू पितो ।। नॉनव्हेज मात्र टाळतो ।। ज्याची जागा […]

छंद

बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात. जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही. […]

मिसळ अशांना ‘पावा’यची नाही रे!

अर्थात वर वर्णन केलेले ‘मिसळखाऊ’ आणि अशी ‘मिसळ’ मिळणारी हॉटेल तुम्हाला पुण्यात, कोल्हापुरात किंवा नाशकात नाही मिळणार. हा, ऊपनगरात मिळाली तर मिळतील. पण गावाकडे मात्र तुम्हाला हमखास अशी ‘प्रसिद्ध मिसळ’ची हॉटेल मिळतीलच मिळतील. हे झाले मिसळपुराण. पण हे मिसळ वाले ‘भाऊ’ ‘तात्या’ ‘रामा’ हे एक वेगळेच आणि त्यांच्या मिसळसारखेच चटकदार प्रकरण असते. आमचा मिसळवाला रामाही त्याला अपवाद नाही. […]

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी…

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! फापट पसारा आवरून सारा , आता सुटसुटीत व्हायचं आहे ! याच्या साठी त्याच्या साठी , हे हवं , ते हवं इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं नवं हव्या हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, बॅग हलकी स्वतः पुरती आता फक्त […]

रस्त्याचं दुखणं

औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ? […]

अमेरिका अमेरिका

सिअँटल एक मोठं शहर..समुद्रकिना-यावरचं…बेलेव्ह्यु सिअँटलचंच उपनगर…पण दोन्ही ठिकाणच्या चलनवलनात बराच फरक…अगदी पुण्याच्या गंज पेठेत आणि बाणेर -औंध मधे आहे तसाच… हिरव्यागार टेकड्या टेकड्यांवर वसलेलं…हे एक नितांत सुंदर टुमदार शहर….मोकळे ढाकळे रस्ते.. विकएंडमुळे रस्त्यांवर रहदारी कमी..सुट्टीच्या दिवशी मुंबईच्या फोर्ट भागात असतं तसं… […]

1 34 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..