नवीन लेखन...
Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

दोन पेगची मजा

थोडी थोडी प्या घाई करायची नाही दोन पेगची मजा चार पेगमध्ये नाही नको तो हॅंगओव्हर दुसरा दिवसही छान पिताना राहू द्या थोडे तरी भान फुकट मिळाली तरी जास्त ढोसू नका घ्या तुम्हीच काळजी नको ते वका वका ग्लासकडे लक्ष द्या खम्ब्याकडे नको मला घरी सोडा मित्रांना विनंती नको चालता आले पाहिजे चालविता आली पाहिजे आपल्याच घरी […]

मे महिन्याची सुट्टी

पोरांना मे महिन्याची उन्हाळी सुट्टी पडली की घरातल्या बायकांना जरा निवांतपणा मिळतो मग याच उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग या बायका इतर वार्षिक घरगुती पदार्थाच्या साठवणीने करतात. जसं कि, चिनीमातीच्या बरण्यांमध्ये लोणचं बनवून वर्षभरासाठी मुरवत ठेवणे, लाल मिरची, शंकासुरी मिरचीचे लाल मसाले (कांडायला) दळायला देणे, नानकटाया बनवून बेकरीत भाजायला देणे, आमपोळ्या, फणसपोळ्या, मुरांबा बनवणे, फणसाचे काप तळणे वगैरे. […]

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

आपलं आयुष्य कसं असावं हा निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. जे विद्यार्थी आई वडिलांनी पसंतीचं करीयर करू दिलं नाही म्हणून आपल्या अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडतात. तसंच घरच्यांचा विरोध असतांनाही व्यसनं करतात, आपल्याच पसंतीचा जोडीदार आणतात. ह्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला जेथे सोईस्कर असते तिथे आपण आपले निर्णय घेतो आणि इतर ठिकाणी आपल्या त्रासाचा किंवा अपयशाचा दोष दुसऱ्यांना देतो. […]

बॅड पॅच- एक संघर्ष…!!!

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!! […]

गुरुबोध मात्र विसरू नकोस….

रोज थोडे तरी कार्य केल्यावाचून राहू नकोस, ब्रह्यांडनायक पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरु नकोस…. तुझ्या वाटेत आडवे खूप येतीलही… पायात पाय घालून पाडवतीलही…. घाबरून त्यांना तू तुझं उभे राहणं सोडू नकोस.. सद्गुरू पहातायेत तुला गुरूबोध मात्र विसरू नकोस तुझं कौतुक प्रत्येकाला इथं रुचेलच असं नाही… कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असंही नाही… तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास […]

टीव्हीच्या आठवणी…

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे.. […]

सह्याद्री पुन्हा गहिवरणार

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला… आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन.. माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो… काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा…. चिरून तो […]

उत्सव माझ्या कवितेचा

हे असेच मी बनावे..  नी असेच मी घडावे.. शब्दांनी ही रे माझ्या, माणसासाठीच लढावे. विष प्यावे अन शंकर व्हावे, शब्द माझे पैगंबर व्हावे.. फकिरा लिहावी इथे साठे नी शब्दांनीच आंबेडकर व्हावे.. आगरकर सुधारक हे दिवाने यावे, खरा धर्म सांगण्या गुरुजी साने यावे.. जोतिबा होऊन समाजाचे सृजन करावे, कवितेत मिराने प्रेमाचे भजन करावे.. पाजावे नाथाने गाढवास काशीचे […]

आई – मुलगी

आई – मुलीचं नातं ममतेचं आपुलकीचं ओढ असते दोघींनाही  प्रेमात वास्तल्याचं प्रेमाच्या जाणिवेचा आई अथांग सागर माया ममतेने तिचा करूया जागर मुलगी म्हणजे ईश्वराची गोड भेट लावूनी माया जिव्हाळा कवटाळून हृदयाशी थेट ‘आई’ एक आठवण प्रेमाची साठवण आई एक नाव जगावेगळा भाव आई म्हणजे एक गोड नातं जिवनाचं बहरतं पातं आई म्हणजे घराचा आधार आईविना घर […]

बुलढाण्यातली मराठी बोली

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे. […]

1 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..