आकाश कंदील तेजाचा दूत
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]
दिवाळी या शब्दातच दिव्याचे महत्व अधोरेखित होते. ज्यावेळी विद्युत पुरवठा उपलब्ध झालेला नव्हता अशा काळात आकाशकंदीलाचे महत्व विशेष होतेच. […]
भल्या पहाटे कोकीळ नावाचा भाट गाऊ लागतो त्याच्या भैरवाचे सूर मनात रूंजी घालू लागतात थंडगार झुळुकांनी आम्रवृक्षांचा गंधित धूप दरवळू लागतो.. उगवत्या सूर्यबिंबाच्या मस्तकी टिळ्याने शुचिर्भूत आकाश अधिकच तेजस्वी दिसते पक्ष्यांच्या कूजनाने काकडआरती होते पुराणपुरुष डोंगरही आळस झटकून वेदऋचा म्हणण्यास ताजेतवाने होतात आणि हा निसर्गाचा व्यापार पाहत मी जागी होते… पौर्णिमेचे चंद्रबिंब उत्तररात्री डोळ्यात साठवून मिटलेल्या […]
भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते. […]
उत्तर भारतातील घराघरात तुलसी रामायणाचे वाचन होते, ते सार्वजनीन आहे. परंतु पंप रामायणाचा परिचय समाजाला न झाल्याने ते लोकाभिमुख न होता केवळ साहित्य वर्तुळातच प्रसिद्ध पावले. या रामायणाचा कर्ता नागचंद्र याचा काळ इ.स. १०७५ ते ११०० असावा असे मानले जाते. चालुक्य व होयसळ राजांनी नागचंद्राचा सन्मान केला असे मानले जाते. नागचंद्र जैन परंपरेचे उपासक व गुरुभक्त असून जैन परंपरेविषयी निष्ठा व भक्ती त्यांच्या साहित्यातून दिसून येते. […]
एका असुराने ज्ञानाचं भांडार सामान्य जनांसाठी खुलं केलं म्हणून त्याचा वध झाला. वध होण्यापूर्वी तो हे ज्ञानाचं संचित घेऊन समुद्रातील एका शंखात लपला. देवांच्या विनंतीवरून विष्णूने माशाचा अवतार घेतला आणि समुद्रात जाऊन शंखात लपलेल्या या असुराचा वध केला….. शंखात लपलेला म्हणून शंखासुर…. संकासूर. डोक्यावर शंकूच्या आकाराची टोपी घालतो म्हणूनही शंकासूर. […]
सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया…. कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते. […]
रत्नागिरी जिल्ह्यातलं राजापूर तालुक्यातलं ताम्हाणे हे आमचं बारा वाड्यांचा छोटस गाव. आमच्या गावाला रोज लवकरच जाग येते तरीही दर बुधवारी आमच्या गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आमच्या गावापासून नऊ किलोमीटरवर पाचल नावाच्या गावी हा बाजार दर बुधवारी भरतो. फक्त आमच्याच नाही तर पाचलची पंचवीस किलोमीटरच्या परिसरातील गावांमधून लोक या बाजारासाठी येतात. […]
गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल. […]
मासिक पाळी ही स्त्रियांच्या जीवनातील एक शारीरिक नैसर्गिक गोष्ट आहे. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने विचार करता मासिक पाळीचे महत्व स्त्रीच्या आयुष्यात महत्वाचे आहे.नवीन जीवाला जन्माला घालण्याची ही क्षमता स्त्रियांचे पुरुषांपेक्षा असेलेले वेगळेपण दाखविते.असे असले तरी हिंदू परंपरेमध्ये मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अस्पर्श किंवा अशुद्ध समजले जाते. सदर शोधनिबंधात या विषयी काही नवा विचार मांडण्याचा अभ्यासपूर्ण प्रयत्न […]
मृत्यू हा अटळ आहे, त्याला पर्याय नाही , ती मनुष्य जीवनाची अनिवार्यता आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ही नक्कीच सुखावह घटना नाही. जवळच्या आप्ताचा, स्नेहीजनाचा मृत्यू अनुभविताना कोणत्याही सहृदय माणसाचे मन हेलावते, शोकमग्न होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions